Join us

नवे वर्ष देणार लाखाे नाेकऱ्या; कंपन्यांनी झटकली मरगळ, हवे मजबूत मनुष्यबळ; तरुणांना अनेक संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:37 IST

नाेकरभरतीचा फाेकस ‘एआय’, ‘डेटा’ विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानावर राहणार आहे. 

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रात गेल्या दाेन वर्षांमध्ये मरगळ आली हाेती. ती झटकून टाकत हे क्षेत्र नव्याने भरारी घेण्याच्या तयारीत आहेत. आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात माेठ्या प्रमाणावर नाेकरभरती हाेणार असल्याची चिन्हे आहेत. नाेकरभरतीचा फाेकस ‘एआय’, ‘डेटा’ विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानावर राहणार आहे. ‘सीआयईएल’ या संस्थेने विविध क्षेत्रांतील नाेकरभरतीचा आढावा घेतला. त्यानुसार, २०२४मध्ये झालेलया नाेकरभरतीच्या तुलनेत नव्या वर्षात १० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती हाेऊ शकते. बहुतांश कंपन्यांनी तशी तयारी केली आहे. काही माेठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील मनुष्यबळ वाढविण्याची याेजना आहे. तर काही कंपन्यांनी तरुणाईला आपल्याकडे ओढण्यासाठी यावेळी कॅम्पस मुलाखतींवर जाेर दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या हाती पदवी पडण्यापूर्वी नाेकरीचे पत्र राहणार आहे.

१.२ काेटी नाेकऱ्या देणार इलेक्ट्राॅनिक्स क्षेत्र- एआय आणि सेमिकंडक्टर क्षेत्रातील विकासामुळे देशातील इलेक्ट्राॅनिक्स क्षेत्र येत्या ३ वर्षांमध्ये १.२ काेटी नाेकऱ्या निर्मिती करणार असल्याचा अंदाज आहे. 

- ३० लाख थेट नाेकऱ्यांची निर्मिती हाेईल. तसेच ९० लाख अप्रत्यक्ष राेजगारनिर्मितीचा अंदाज. 

यांना मिळेल संधी२० लाख आयटीआय व्यावसायिक१० लाख अभियंते

या क्षेत्रात सर्वाधिक नाेकरभरतीसेमिकंडक्टर, स्टार्टअप्स, सायबर सुरक्षा, नविनीकरणीय उर्जा, एआय, ई-काॅमर्स आदी.

वाढीव मनुष्यबळाची गरज का?- विस्तार याेजना- नव्या उत्पादनांचे लाँचिंग- भविष्यातील श्रमशक्ती घडविणे- डिजिटल तज्ज्ञांची टीम उभारणे

५०० अब्ज डाॅलरपर्यंत हे उत्पादन पुढील ५ वर्षांमध्ये नेण्याचे लक्ष्य आहे.

१०० अब्ज डाॅलर एवढे देशातील इलेक्ट्राॅनिक्स क्षेत्रातील उत्पादन आहे. 

टॅग्स :नोकरीकर्मचारी