Join us

नवीन वर्षात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? गुगलने दिला सायबर क्राइमचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:15 IST

google warn : नवीन वर्षात तुम्ही सहल आयोजित केली असेल तर थांबा. गुगलने जीमेल वापरकर्त्यांना सायबर गुन्हेगारांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

google warn : गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून तुम्हालाही या दिवसात फिरायला जाण्याची इच्छा होत असेल. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तर अनेकजण आपल्या सहलीचे नियोजन करत असतील. मात्र, याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची दखल आता खुद्द गुगलने घेतली असून वापरकर्त्यांना सावध केलं आहे. गुगलवर सर्च करताना अशा ट्रॅपपासून दूर राहण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. 

गुगलने जीमेल (Gmail) वापरकर्त्यांना सुट्टीच्या काळात घोटाळ्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये, कंपनीने म्हटले आहे की जीमेल ९९.९% पेक्षा जास्त स्पॅम, फिशिंग आणि मालवेअर ब्लॉक करते. सुधारित सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे, गेल्या वर्षीच्या तुलनेत या सुट्टीच्या मोसमात घोटाळे होण्यात ३५% कपात झाली आहे. जीमेल अनेक संदेश वापरकर्त्याच्या इनबॉक्समध्ये पोहोचण्यापूर्वी ब्लॉक करते. पण तरीही वापरकर्त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. गुगलने विशेषतः ३ प्रकारच्या घोटाळ्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

हॉलीडे घोटाळाचालान स्कॅम : सायबर गुन्हेगार जीमेल वापरकर्त्यांना बनावट चालान पावत्या पाठवतात. संबंधित शुल्कातून सूट हवी असेल तर दिलेल्या क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले जाते. नंबरवर कॉल केल्यानंतर कारवाईची भिती दाखवून पीडित व्यक्तीस पैसे भरण्यासाठी भाग पाडले जाते.

सेलिब्रिटी स्कॅमआरोपी लोकांची फसवणूक करण्यासाठी सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तिंच्या नावाचा वापर करतात. सेलिब्रिटी असल्याचे भासवतात किंवा एखाद्या उत्पादनाची जाहिरात करतात. सेलिब्रिटी ऑफर्स देत असल्याचे पाहून अनेकजण ट्रॅपमध्ये अडकतात.

खंडणीएखाद्या व्यक्तीकडून खंडणी उकळण्यासाठी गुन्हेगार संबंधित व्यक्तीची सर्व माहिती मिळवतात. अनेकदा ही माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुनच त्यांना मिळते. या माहितीचा वापर करुन मेल पाठवून धमकी दिली जाते. खंडणी दिली नाहीतर जीवे मारण्याची किंवा संवेदनशील माहिती सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धमकी दिली जाते. अशा गोष्टींना बळी पडून लोक अनेकदा पैसे देतात.

टॅग्स :सायबर क्राइमगुगलपर्यटन