Join us

२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:53 IST

New GST Rates जीएसटीचे नवीन दर सोमवारी २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. यामध्ये अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. पण, काही वस्तू अशाही आहेत, ज्यांच्या किमती कमी होणार नाहीत.

New GST Rates : येत्या २२ सप्टेंबरपासून जीएसटीचे नवे दर लागू होत आहेत. या नव्या बदलांमुळे रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार असल्या, तरी काही अशा वस्तूही आहेत, ज्यांच्या दरात कोणताही बदल होणार नाही. सरकारचा नवा जीएसटी आराखडा लागू झाल्यानंतरही काही महत्त्वाच्या आणि लक्झरी वस्तूंचे दर स्थिर राहणार आहेत.

या वस्तूंच्या दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही०% स्लॅब: या स्लॅबमध्ये असलेल्या वस्तूंवर आधीही कोणताही कर नव्हता आणि आताही नाही. यामध्ये ताजी फळे आणि भाज्या, दूध, मोकळे पीठ, ब्रेड, रोटी आणि पराठे यांसारख्या रोजच्या वापरातील खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

५% स्लॅब: इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) यावर आधीपासूनच ५% जीएसटी लागू होता आणि तो कायम राहणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार किंवा इतर ईव्हीच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही.

३% स्लॅब: सोने, चांदी, हिरे आणि इतर मौल्यवान दगडांवर ३% जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. हा एक विशेष कर स्लॅब असून त्यात कोणताही बदल नाही.

१८% स्लॅब: अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ज्या आधीपासून १८% स्लॅबमध्ये होत्या, त्यांचे दरही स्थिर आहेत. यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.

लक्झरी आणि तंबाखू उत्पादने: सिगारेट, तंबाखू उत्पादने, गुटखा आणि पान मसाला यांसारख्या लक्झरी आणि 'सिन गुड्स'वर सध्या तरी २८% जीएसटी आणि कंपनसेशन सेस कायम राहील. हे शुल्क लवकरच ४०% पर्यंत वाढवले जाण्याची शक्यता आहे, पण लगेच त्यात कोणताही बदल होणार नाही.

वाचा - आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम

एकूणच, जीएसटी २.० चा उद्देश किमती कमी करणे असला, तरी काही विशिष्ट वस्तूंचे दर सरकारकडून स्थिर ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :जीएसटीमुख्य जीएसटी कार्यालयकरपैसा