Join us
Daily Top 2Weekly Top 5

बनावट FASTag Annual Pass द्वारे नवीन फ्रॉड, NHAI ने दिला इशारा; कसं वाचाल, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:36 IST

FASTag Annual Pass Fraud: तुमच्याकडे कार असेल आणि तुम्ही 'फास्टॅग ॲन्युअल पास' खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी केवळ तुमच्यासाठीच आहे. जर तुम्ही तुमच्या गाडीसाठी हा पास खरेदी करणार असाल, तर तुम्हाला सतर्क राहावं लागेल.

FASTag Annual Pass Fraud: तुमच्याकडे कार असेल आणि तुम्ही 'फास्टॅग ॲन्युअल पास' खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी केवळ तुमच्यासाठीच आहे. जर तुम्ही तुमच्या गाडीसाठी हा पास खरेदी करणार असाल, तर तुम्हाला सतर्क राहावं लागेल. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला ३००० रुपयांचा फटका बसवू शकतो. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची एक नवीन पद्धत शोधली असून ते आता फास्टॅग ॲन्युअल पास खरेदीदारांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. याप्रकरणी NHAI नं (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया) इशारादेखील दिलाय.

कुठे मिळतो फास्टॅग ॲन्युअल पास?

NHAI च्या मते, अनेक बनावट वेबसाइट्स आणि लिंक्स १ वर्षाची व्हॅलिडिटी असलेल्या फास्टॅग ॲन्युअल पासची विक्री करण्याचा दावा करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात हा पास केवळ Rajmargyatra या अधिकृत मोबाईल ॲपवरूनच खरेदी केला जाऊ शकतो. या ॲप व्यतिरिक्त फास्टॅग ॲन्युअल पास इतर कुठेही मिळत नाही. जर एखादी व्यक्ती तुम्हाला कोणत्याही वेबसाइट किंवा लिंकद्वारे हा पास विकत असेल, तर तुम्ही सावध व्हायला हवं; कारण हे एक जाळं असून त्यात अडकल्यास तुमचे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकतं.

सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक आहे 'या' व्यवसायिकाची नात; कोणता आहे त्यांचा बिझनेस? जाणून घ्या

NHAI नं केली पोस्ट

"NHAI ने नॅशनल हायवे युजर्सना अशा बनावट वेबसाइट्स आणि अनधिकृत लिंक्सपासून सावध केलं आहे, जे FASTag ॲन्युअल पास विकण्याचा दावा करत आहेत. कृपया लक्षात घ्या की, FASTag ॲन्युअल पास केवळ अधिकृत 'राजमार्गयात्रा' ॲपद्वारेच खरेदी केला जाऊ शकतो. इतर कोणतीही वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्म जो ॲन्युअल पास देत आहे, तो अधिकृत नाही. यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते किंवा तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. सुरक्षित राहण्यासाठी, अनोळखी लिंक्सवर क्लिक करणं टाळा, तुमच्या गाडीचे किंवा FASTag चे तपशील अनोळखी स्त्रोतांसोबत शेअर करू नका आणि नेहमी 'राजमार्गयात्रा' ॲपचाच वापर करा," असं NHAI नं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय.

English
हिंदी सारांश
Web Title : NHAI warns of FASTag annual pass fraud; stay alert!

Web Summary : NHAI warns against fake FASTag annual pass websites. Purchase only via the official Rajmargyatra app to avoid scams and potential financial loss. Protect your data!
टॅग्स :फास्टॅगधोकेबाजी