Join us

नेटफ्लिक्स, अनलिमिटेड 5G, फ्री कॉलिंग... Reliance Jio च्या या दोन विशेष प्लॅन्सची किंमत किती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 10:54 IST

Reliance Jio News : रिलायन्स जिओनं नुकतंच एक मोठं यश मिळवलंय. रिलायन्स जिओच्या सबस्क्रायबर्सची संख्या ४९ कोटींवर पोहोचली आहे. आता जिओनं मनोरंजन प्रेमींसाठी दोन खास प्रीपेड प्लॅन ऑफर केले आहेत.

Reliance Jio News : रिलायन्स जिओनं नुकतंच एक मोठं यश मिळवलंय. रिलायन्स जिओच्या सबस्क्रायबर्सची संख्या ४९ कोटींवर पोहोचली आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या टेलिकॉम कंपनीनं मनोरंजन प्रेमींसाठी दोन खास प्रीपेड प्लॅन ऑफर केले आहेत. हे प्लॅन नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनसह येतात. रिलायन्स जिओनं नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनसोबत येणाऱ्या या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. पूर्वी १,०९९ आणि १,४९९ रुपयांमध्ये येणारे प्लॅन आता १,२९९ रुपये आणि १,७९९ रुपयांमध्ये मिळतात.

१,२९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना तीन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स मोबाइल सब्सक्रिप्शन मिळतं. तसंच दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनमध्ये जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड आणि जिओ टीव्हीचा अॅक्सेस मिळतो.

१,७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय?

तर ग्राहकांना १,७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शन मिळतं. या प्लॅनमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात.

रिलायन्स जिओनं जुलैमध्ये आपल्या इतर रिचार्ज प्लॅनच्या किंमतीही वाढवल्या होत्या. २ जीबी डेटा असलेल्या २८ दिवसांच्या प्लॅनची किंमत २९९ रुपयांवरून ३४९ रुपये करण्यात आली आहे. १.५ जीबी डेटा असलेल्या २८ दिवसांच्या प्लॅनची किंमत २३९ रुपयांवरून २९९ रुपये करण्यात आली आहे. तर ३ जीबी डेटा असलेला २८ दिवसांचा प्लॅन केवळ ४४९ रुपयांमध्ये मिळतो. तर दुसरीकडे १.५ जीबी डेटा असलेल्या ८४ दिवसांच्या प्लॅनची किंमत ६६६ रुपयांवरून ७९९ रुपये करण्यात आली आहे.

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानीनेटफ्लिक्स