Nepal Richest Man : भारतात अब्जाधीशांची काही कमी नाही, पण आज आम्ही तुम्हाला आपल्या शेजारच्या नेपाळमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. त्यांचे नाव आहे बिनोद चौधरी. फेब्रुवारी २०१३ मध्ये ते नेपाळमधील एकमेव अब्जाधीश म्हणून ओळखले गेले आणि आजही ते नेपाळचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. विशेष म्हणजे, तुम्ही त्यांच्या कंपनीचे प्रसिद्ध 'वाय वाय' (Wai Wai) इन्स्टंट नूडल्स अनेकदा खाल्ले असतील.
बिनोद चौधरींची एकूण संपत्ती किती?बिनोद चौधरी यांची एकूण संपत्ती अंदाजे १.८ अब्ज डॉलर्स (सुमारे १५,००० कोटी रुपये) आहे. ते चौधरी ग्रुपचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. ते फक्त व्यावसायिक नाहीत तर अनेक धर्मादाय कामांमध्येही सक्रिय असतात. याशिवाय, त्यांना पुस्तके लिहिणे आणि चित्रपट बनवणे देखील आवडते. वाई वाई नूडल्स ब्रँडमुळे ते प्रत्येक घरात पोहोचले आहेत.
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची संपत्ती २४७ अब्ज डॉलर्स आणि मुकेश अंबानींची १०७.१ अब्ज डॉलर्स आहे. त्यांच्या तुलनेत चौधरींची संपत्ती कमी असली तरी, ते नेपाळमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
सीए होण्याचे स्वप्न, पण व्यवसायात जमले!विनोद चौधरींचा जन्म काठमांडूमधील एका व्यावसायिक कुटुंबात झाला, त्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच व्यवसायाची आवड होती. त्यांना सुरुवातीला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे होते. पण, जेव्हा त्यांचे वडील आजारी पडले, तेव्हा कुटुंबाच्या व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात त्यांना मोठे यश मिळाले.
'वाय वाय' नूडल्सने मिळवली ओळखएकदा विनोद चौधरी थायलंडच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी पाहिले की इन्स्टंट नूडल्सना खूप मागणी आहे. त्याच धर्तीवर त्यांनी नेपाळमध्ये 'वाय वाय' नूडल्स लाँच केले. थोड्याच दिवसांत, हा ब्रँड भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध झाला.
भारतात मॅगीची मोठी पकड असतानाही, वाई वाईने आपले स्थान निर्माण केले. १९९० मध्ये त्यांनी सिंगापूरमध्ये सिनोव्हेशन ग्रुपची सुरुवात केली. त्यानंतर, १९९५ मध्ये, त्यांनी दुबई सरकारकडून नबिल बँकेत नियंत्रणात्मक हिस्साही मिळवला.
रतन टाटा आणि नेल्सन मंडेलांचे चाहतेविनोद चौधरी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे आजोबा आणि वडिलांना देतात. यासोबतच ते टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांच्यापासून खूप प्रेरित आहेत. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व रणबीर कपूर यांचेही ते चाहते आहेत.