Join us  

अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होणार; रघुराम राजन यांचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 11:06 AM

भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका, इटलीपेक्षाही जास्त नुकसान सहन करावं लागेल; राजन यांच्याकडून भीती व्यक्त

नवी दिल्ली: आधीच मंदीसदृश्य अवस्थेत जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं कोरोनामुळे मोडलं आहे. गेल्या तिमाहीत जीडीपीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली. जीडीपी उणे २३.९ टक्क्यांपर्यंत घसरल्यानं चिंता वाढली आहे. त्यातच आता रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था आणखी वाईट होईल, असा धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षा अधिक फटका बसेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे. कोरोनामुळे या दोन्ही देशांना खूप मोठा फटका बसला आहे.कोरोनाचा भयावह वेग! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानीरघुराम राजन यांनी त्यांच्या लिंक्डइन पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. अर्थव्यवस्थेतील काही प्रमुख क्षेत्रांचा जीडीपी जाहीर झाला आहे. अजून काही क्षेत्रांचा जीडीपी जाहीर व्हायचा आहे. तो जाहीर झाल्यावर देशाच्या जीडीपीची अवस्था आणखी बिकट होईल, अशी भीती राजन यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जात नाही, तोपर्यंत फारसा खर्च करता येणार नाही, असं यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.परिस्थिती गंभीर! "2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट"कोरोना काळात सरकारनं आतापर्यंत केलेली मदत पुरेशी नाही. भविष्यात प्रोत्साहन पॅकेज देण्यासाठी सरकार आज संसाधनं वाचवू पाहतंय. सरकारची ही रणनीती आत्मघाती आहे. कोरोना नियंत्रणात आल्यावर दिलासा देऊ, पॅकेज जाहीर करू असा विचार सरकारी अधिकारी करत आहेत. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजलेलं नाही. या मार्गानं गेल्यास पॅकेज जाहीर होईपर्यंत अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालेलं असेल, असं राजन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.कोरोना संपवणारं ‘ब्रह्मास्त्र’ चोरण्यासाठी गुप्तहेरांमध्ये छुपं युद्ध; अमेरिका, चीन अन् रशिया सज्जरघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेची तुलना रुग्णाशी करून परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 'अर्थव्यवस्था एखादा रुग्ण असल्याची कल्पना केल्यास तर त्या रुग्णाला सातत्यानं उपचारांची आवश्यकता आहे. दिलासा न मिळाल्यास लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल. ते मुलांना शिकवू शकणार नाहीत. मुलांवर काम करण्याची किंवा भीक मागण्याची वेळ येईल. कर्जासाठी लोकांना त्यांच्याकडे असणारं सोनं गहाण ठेवावं लागेल. ईएमआय, घरभाडं देणं कठीण होईल. लहान कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकणार नाहीत. त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत जाईल आणि त्या बंद होतील. अशा प्रकारे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवेपर्यंत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली असेल,' असं राजन यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

टॅग्स :रघुराम राजनकोरोना वायरस बातम्या