Join us

1 जानेवारीला सुरू होणार मोदींची सर्वात मोठी योजना, फक्त 21 दिवसांत मिळणार नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 16:54 IST

1 जानेवारी 2019मध्ये मोदी सरकार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- ज्या लोकांना बेरोजगारीची समस्या सतावते आहे. तसेच ज्यांना कमी पगार आहे, अशांना मोदी सरकार नवी वर्षात गुड न्यूज देणार आहे. 1 जानेवारी 2019मध्ये मोदी सरकार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. खरं तर नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच सरकार वरुण मित्र योजना सुरू करत आहे. ज्या योजनेंतर्गत सरकार तुम्हाला तीन आठवड्यांची मोफत ट्रेनिंग देणार आहे. हा उपक्रम मिनिस्ट्री ऑफ MNRE आणि NISEनं आयोजित केला आहे. याला सोलर वॉटर पंपिंग 'वरुण मित्र' उपक्रमही संबोधलं जात आहे. या उपक्रमांतर्गत ट्रेनिंगनंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळणार आहे. विशेष म्हणजे कमी पगार घेणारे लोक जास्त पगार मिळवू शकतात. या उपक्रमाचा उद्देश रिन्युएबल एनर्जी, सोलर रिसोर्स असेसमेंट आणि सोलर फोटोवोल्टिक, साइट फिजिब्लिटी, वॉटर टेबल, सोलर वॉटर पम्पिंग कंपोनंटचे वेगवेगळे प्रकार, डीटी कंव्हर्टर, इंव्हर्टर, बॅटरी, मोटर्स, पम्प मोटर, इंस्टॉलेशन ऑफ ग्रिड अँड स्टँड अलोन, सोलर पीवी वॉटर पम्पिंग सिस्टीम या क्षेत्राकडे जनतेला प्रोत्साहित करण्याचा आहे. तसेच सोलर पीवी वॉटर पम्पिंग सिस्टीमसाठी सेफ्टी प्रॅक्टिस, ऑपरेशन अँड मेंटनन्स, टेस्टिंग आणि कमिशनिंगची माहितीही देण्यात येणार आहे.ही ट्रेनिंग 1 जानेवारी ते 19 जानेवारी 2019पर्यंत सुरू राहणार आहे. ज्यात जवळपास 120 तास क्लास दिले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत तुम्हाला 28 डिसेंबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. या उपक्रमांतर्गत क्लास रूम लेक्चर, प्रॅक्टिकल, फील्ड व्हिझीट आणि इंडस्ट्रियल व्हिझीटपण करवलं जाणार आहे. या उपक्रमांतर्गत ट्रेनिंग मोफत मिळणार असून, फक्त होस्टेलमध्ये राहण्यासाठी प्रतिदिन 600 रुपये मोजावे लागणार आहेत. 

टॅग्स :नरेंद्र मोदीसरकारी योजना