mutual fund sip : प्रत्येक मध्यमवर्गीयाचं श्रीमंत होण्याचं स्वप्न असतं. यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करत असतो. पण, फक्त खूप मेहनत केली म्हणजे तुम्ही कोट्यधीश व्हाल असं नाही. तर यासाठी उत्पन्नासोबत गुंतवणूक करणे देखील खूप महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मासिक उत्पन्नाचा काही भाग अशा योजनेत गुंतवावा जो जास्तीत जास्त नफा देईल. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करणे.
म्युच्युअल फंडात एसआयपीगेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहे. कारण, यात एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे लहान गुंतवणुकीने सुरुवात करता येते. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा थोडी थोडी गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम गोळा करू शकता. एवढेच नाही तर, जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घकाळ नियमितपणे गुंतवणूक केली तर तुम्ही कोट्यवधी रुपयांचा निधी देखील गोळा करू शकता. म्युच्युअल फंड एसआयपीची सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे तुम्ही त्यात तुमची गुंतवणूक फक्त २५० रुपयांपासून सुरू करू शकता. अशा परिस्थितीत, कमी उत्पन्न असलेले लोक देखील म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये सहज गुंतवणूक करू शकतात.
दरमहिना २००० रुपये गुंतवूण व्हा कोट्यधीशजर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घकाळ नियमितपणे दरमहा २००० रुपये गुंतवले तर तुम्ही कोट्यधीश देखील होऊ शकता. म्युच्युअल फंड एसआयपी १२ ते १५ टक्के दराने परतावा देते. जर तुम्ही ३५ वर्षे सतत एसआयपीमध्ये दरमहा २००० रुपये गुंतवले तर तुम्हाला श्रीमंत होण्यासापासून कोणी रोखू शकत नाही. आता गणित समजून घेऊ. जर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये तुम्ही दरमहा २००० रुपये सतत ३५ वर्षे गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक ८,४०,००० रुपये होईल. जर तुम्हाला १२ टक्के दरानेही परतावा मिळाला तर तुम्हाला १,०१,८१,६६२ रुपये नफा मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला एकूण १,१०,२१,६६२ रुपये मिळतील.
वाचा - 'मला कशासाठीही मस्कची गरज नाही' ट्रम्प आणि इलॉनमध्ये वादाची ठिणगी? व्हिडीओ व्हायरल
(Disclaimer- यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)