Join us

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लॉन्च, RBI च्या ९० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 16:24 IST

आज रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी ९० रुपयांचे नाणे जारी केले. या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते ४० ग्रॅम शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलं आहे.

आज रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाली. रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी ९० रुपयांचे नाणे जारी केले. देशात पहिल्यांदाच ९० रुपयांचे नाणे जारी करण्यात आले आहे. हे नाणे  शुद्ध चांदीचे आहे. याशिवाय यामध्ये ४० ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. ९० रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला ९० रुपये असे लिहिलेले आहे.

या नाण्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिले आहे. त्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो असेल आणि वरच्या परिमितीवर हिंदीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि खालच्या परिमितीवर इंग्रजीमध्ये लिहिलेले असेल. लोगोच्या खाली RBI @90 असे लिहिलेले असेल.

दोन भाऊ देणार 5000 कोटींचे दान; कंपनीच्या शेअर्समध्येही तेजी, 3 महिन्यांत 51% वाढ

भारत सरकारच्या टकसालमध्ये बनवलेल्या या ९० रुपयांच्या नाण्याचे वजन ४० ग्रॅम असेल, हे ९९.९ टक्के शुद्ध चांदीपासून बनलेले आहे. याआधीही १९८५ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण महोत्सवी आणि २०१० मध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्लॅटिनम ज्युबिलीवर स्मारक नाणी जारी करण्यात आली आहेत.

९० रुपयांचे हे नाणे लाँच केल्यानंतर दर्शनी मूल्यापेक्षा अधिक प्रीमियमवर विकले जाईल. वृत्तानुसार, या नाण्याची अंदाजे किंमत ५२०० ते ५५०० रुपये असण्याची शक्यता आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसह नाणे संग्राहकांमध्ये या नाण्याबाबत प्रचंड उत्साह आहे. १९ मार्च २०२४ रोजी, आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी हे नाणे जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना देखील जारी केली होती.

आज या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआयची भूमिका खूप महत्त्वाची आणि मोठी आहे. आरबीआय जे काही काम करते त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक समावेशनाचे फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकनरेंद्र मोदी