Join us

Multibagger Stock: गुंतवणुकदार मालामाल; 'या' मल्टीबॅगर स्टॉकने दिले 35609% रिटर्न्स, कंपनीने केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 19:02 IST

Multibagger Stock: तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा कंपनीबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना 35,609% परतावा दिला आहे.

Multibagger Stock: तुमच्यापैकी अनेकजण शेअर बाजारात पैसे गुंतवत असतील. शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी योग्य समज आणि अनुभव आवश्यक आहे. या शेअर बाजारातून अनेकजण खूप पैसे कमावतात, काहीजण गमवतातही. यात फायदा आणि धोका, दोन्ही आहे. सहसा लोक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्यांमध्येच पैसे गुंतवतात. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीच्या स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना तब्बल 35,609% रिटर्न्स दिले आहेत.

शेअर्सने दिला 35,609% परतावा आज आम्ही CPVC पाईप बनवणाऱ्या Astral Ltd. च्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. Astral Limited च्या शेअर्सने बाजारात पदार्पण केल्यापासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना 35,609% रिटर्न्स दिले आहेत. याशिवाय, आता कंपनीने 175% लाभांश देखील जाहीर केला आहे. कंपनीने शेअर बाजारात अवघ्या 5.57 रुपयांच्या शेअरऩे प्रवेश केला होता, तर आजच्या तारखेला हा शेअर सुमारे 2000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

लाभांश देण्याची शिफारस केली एस्ट्रल लिमिटेडने म्हटले की, कंपनीने 2021-22 साठी 1 रुपये दर्शनी मूल्यावर 1.75 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. हा लाभांश सुमारे 175% आहे. कंपनीची 45वी वार्षिक सर्वसाधारण सभा 5 सप्टेंबर रोजी आहे. या बैठकीनंतर हा लाभांश शेअर होल्डर्सना दिला जाईल. यासाठी कंपनीने 22 ऑगस्ट 2022 ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे.

एका महिन्यात 16.95% वाढ एस्ट्रल लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1.31% च्या उसळीसह 1989 रुपयांवर बंद झाले. 2007 मध्ये जेव्हा कंपनीने शेअर बाजारात पदार्पण केले होते, तेव्हा त्यांच्या शेअरची किंमत फक्त 5.57 रुपये होती. आता हा शेअर 1989 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच आतापर्यंत कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना 35,609.16% परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 40,076.74 कोटी रुपये आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 16.95% वाढ झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार