Join us

मुकेश अंबानी उघडणार सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस; काय आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 05:28 IST

नवी दिल्ली : आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती व रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आता सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस ...

नवी दिल्ली : आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती व रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आता सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडणार आहेत. त्यासाठी त्यांनी एक व्यवस्थापक नेमला असून अन्य कर्मचाऱ्यांचीही भरती सुरू केली आहे. या फॅमिली ऑफिससाठी एक जागाही निश्चित करण्यात आली आहे. 

कमी कर व सुरक्षेमुळे सिंगापूर हे ठिकाण अतिश्रीमंत लोकांमध्ये फॅमिली ऑफिससाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हेज फंड अब्जाधीश रे डेलियो व गुगलचे सहसंस्थापक सर्गी ब्रीन यांनीही सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस सुरू केली आहेत. त्यांच्या पंक्तीत आता मुकेश अंबानी यांचा समावेश होणार आहे. 

७०० फॅमिली ऑफिससिंगापूरमध्ये कमी कर व सुरक्षेमुळे जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींनी तिथे फॅमिली ऑफिस सुरू केली आहेत. २०२१ साली अशी ७०० फॅमिली ऑफिस सुरु झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

रिलायन्सचा होतोय उद्योगविस्तारnरिलायन्स इंडस्ट्रीजचे पेट्रोकेमिकल व तेल शुद्धीकरणाचे व्यवसाय आहेत. त्यानंतर या उद्योगसमूहाने ग्रीन एनर्जी, ई- कॉमर्स या व्यवसायांत प्रवेश केला. संपूर्ण भारतात रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला रिटेल व्यवसायही विस्तारला आहे. या उद्योगसमूहाची विदेशातही मोठी उलाढाल आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स