Join us

रिलायन्सची गेमिंग क्षेत्रात एन्ट्री! ई-स्पोर्ट्स व्यवसायासाठी BLAST सोबत हातमिळवणी, कशी आहे योजना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:18 IST

reliance will also enter video games : रिलायन्सने गेमिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'ब्लास्ट'सोबत हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्या मिळून बौद्धिक संपदा (IP) विकसित करण्यासाठी काम करतील

reliance will also enter video games : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं तिथं दबदबा निर्माण केला आहे. रिटेलपासून ऑईलपर्यंत आणि मनोरंजनापासून टेलिकॉमपर्यंत रिलायन्स समूहातील कंपन्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. रिलायन्स आता आणखी एका नवीन क्षेत्रात एन्ट्री करणार आहे. रिलायन्स लवकरच व्हिडिओ गेम्सच्या जगात प्रवेश करणार आहे. रिलायन्सची संपूर्ण मालकीची उपकंपनी राइज वर्ल्डवाइड ही भारतातील ई-स्पोर्ट्स व्यवसायासाठी संयुक्त उपक्रम तयार करणार आहे. यासाठी राइज वर्ल्डवाइडने ब्लास्ट ई-स्पोर्ट्स सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निवेदनानुसार, रिलायन्स आणि ब्लास्ट देशातील गेमिंग मार्केटमध्ये लीडिंग इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (IP) विकसित करण्यासाठी काम करतील.

ब्लास्ट ही जगातील सर्वात मोठ्या स्पर्धा आयोजकांपैकी एक आहेडेन्मार्कमधील एपीएसची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी ब्लास्ट जगातील सर्वात मोठ्या स्पर्धा आयोजकांपैकी एक आहे. भविष्यात मोठमोठ्या कार्यक्रमांना आकर्षित करणे, या भागिदारीचा उद्देश आहे. या करारानंतर ब्लास्टचे सीईओ रॉबी डॉक म्हणाले, की "रिलायन्स भारतातील तळागाळात पोहचलेली कंपनी आहे. देशातील आश्चर्यकारक कौशल्य आणि रिलायन्सची साथ आम्हाला प्रादेशिक ई-स्पोर्ट्स लँडस्केपला नवीन उंचीवर नेण्याची उत्तम संधी मिळाली आहे."

जगातील १८ टक्के गेमर्स भारतातभारतात जसे मैदानावरचे खेळ प्रसिद्ध आहेत. तसेच काही दशकांपासून ऑनलाईन गेम्सचीही लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. रिलायन्स निवेदनानुसार, जागतिक स्तरावरील एकूण गेमर्सपैकी १८% गेमर्स भारतातील आहे. भारत हा सर्वात वेगाने वाढणारी गेमिंग बाजारपेठ आहे. भारताचे गेमिंग मार्केट १९% CAGR ने वाढून २०२४ मध्ये ३.८ बिलियन डॉलरवरून २०२९ पर्यंत ९.२ बिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारत सरकारने "मल्टी-स्पोर्ट्स इव्हेंट" श्रेणीचा एक भाग घोषित करून देशातील ई-स्पोर्ट्सला अधिकृतपणे मान्यता दिली आहे.

वाचा - आता हद्द झाली! डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंग्विनलाही सोडलं नाही; १० टक्के लावला टॅरिफ  

गेमिंगला मिळणार जिओची साथटेलिकॉम क्षेत्रात धुरळा उडवणारी रिलायन्स जिओ कंपनी आता गेमिग क्षेत्रातही काम करणार आहे. हा गेम इव्हेंट्स आणि टीम्सचे मार्केटिंग आणि प्रचार करण्यासाठी जिओच्या वितरण आणि तंत्रज्ञानाचा फायदा होणार असल्याचे रिलायन्स स्पोर्ट्सचे प्रमुख देवांग भीमज्यानी यांनी सांगितले.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीजिओ