Join us

धोनीचा जलवा कायम! निवृत्तीनंतरही करतोय हजारो कोटींची कमाई; उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:48 IST

MS Dhoni Net Worth : आज देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी अजूनही आयपीएलमध्ये दिसतो. पण, त्याचा कमाईचा मुख्य स्त्रोत अनेकांना माहिती नाही.

MS Dhoni Net Worth : भारतीय क्रिकेट संघाचा लाडका माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज, ७ जुलै रोजी ४४ वर्षांचा झाला आहे. 'कॅप्टन कूल' म्हणून जगभरात ओळखला जाणारा धोनी, क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतरही अजूनही प्रसिद्धीच्या झोतात आहे, आणि कमाईच्या बाबतीतही तो मागे नाही. त्याची एकूण संपत्ती १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असून, तो भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

धोनीची एकूण संपत्ती आणि कमाईचे स्रोतमहेंद्रसिंग धोनीची एकूण संपत्ती १००० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे अहवाल सांगतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, आयपीएल सारख्या इतर क्रिकेट फॉरमॅटमधून तो कोट्यवधी रुपये कमावतो.त्याने आतापर्यंत आयपीएल सत्रांमध्ये सुमारे २०० कोटी रुपये कमावले आहेत.२०२५ च्या आयपीएलमध्ये त्याला ४ कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रिटेन केले होते.त्याच्या एकूण संपत्तीचा मोठा भाग विविध कंपन्यांच्या ब्रँड एंडोर्समेंट (Brand Endorsements) आणि व्यवसायातील गुंतवणुकीतून येतो.वेगवेगळ्या कंपन्यांमधील गुंतवणुकीमुळे त्याला प्रचंड नफा मिळाला आहे आणि त्याचे अंदाजे मासिक उत्पन्न सुमारे ४-५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

जाहिरातींद्वारे मोठी कमाईऑगस्ट २०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, त्याची लोकप्रियता आणि मागणी जराही कमी झालेली नाही. टीम इंडियाचा कर्णधार असताना तो अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये दिसायचा आणि आजही तो ब्रँड्सच्या आवडत्या यादीत आघाडीवर आहे.अहवालानुसार, एमएस धोनी सध्या सुमारे दोन डझन कंपन्यांसोबत ब्रँड एंडोर्समेंट करत आहे.यामध्ये एसबीआय, मास्टर कार्ड, फायर बोल्ट, जिओ सिनेमा, स्किपर पाईप आणि गल्फ ऑइल यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.याशिवाय, एशियन फूटवेअर, विंझो, एमवायके लॅटिक्रेट, गरुड एरोस्पेस, ओप्पो, कार्स२४ सारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही त्याला मोठी कमाई होते.

स्टार्टअप्समधील गुंतवणुकीतूनही उत्पन्न

  • धोनी फक्त क्रिकेट आणि जाहिरातींमधूनच नाही, तर एक हुशार गुंतवणूकदार म्हणूनही पुढे आला आहे. त्याने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे, जिथून मिळणारे चांगले परतावे त्याच्या एकूण संपत्तीमध्ये मोलाची भर घालतात.
  • त्याने खाताबुक, प्री-ओन्ड कार स्टार्टअप कार्स२४, प्रोटीन फूड स्टार्टअप शाका हॅरी आणि ड्रोन सर्व्हिसेस स्टार्टअप गरुड एरोस्पेस मध्ये गुंतवणूक केली आहे.
  • २०१६ मध्ये, धोनीने स्वतःचा फिटनेस आणि लाइफस्टाइल कपड्यांचा ब्रँड 'सेव्हन' देखील सुरू केला.
  • त्याच्या उत्पन्नात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या इतर गुंतवणुकींमध्ये ईमोटोराड आणि तगडा राहो यांचाही समावेश आहे.

आलिशान जीवनशैली : घर, फार्महाऊस आणि कडकनाथ!

  • एमएस धोनीची आलिशान जीवनशैली त्याच्या घरांकडे आणि फार्महाऊसकडे पाहून लक्षात येते.
  • त्याची रांची आणि देहरादूनमध्ये कोट्यवधींची घरे आहेत.
  • रांचीमध्ये त्याचे ४३ एकरांवर पसरलेले फार्महाऊस आहे, जिथे तो सेंद्रिय शेती करतो.
  • त्याचा कडकनाथ कोंबडी पालन हा व्यवसायही खूप चर्चेत आहे, कारण काळे कडकनाथ कोंबडी महाग असते आणि ते सुमारे १००० रुपये प्रति किलोने विकले जाते.
  • इतकंच नाही, तर रांचीमध्ये त्याचे हॉटेल माही रेसिडेन्सी नावाचे एक हॉटेल देखील आहे.

कार आणि बाईक कलेक्शन

  • धोनीच्या कार आणि बाईकवरील प्रेमाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान आणि महागड्या गाड्या आणि बाईक्सचा संग्रह आहे, जो नेहमी चर्चेत असतो.
  • त्याच्या कार कलेक्शनमध्ये हमर एच२ (Hummer H2), ऑडी Q7 (Audi Q7), लँड रोव्हर (Land Rover), फेरारी ५९९ जीटीओ (Ferrari 599 GTO), निसान जोंगा (Nissan Jonga), मर्सिडीज बेंझ जीएलई (Mercedes-Benz GLE), आणि रोल्स रॉयस सिल्व्हर रैथ २ (Rolls Royce Silver Wraith II) यांचा समावेश आहे.
  • त्याच्या बाइक कलेक्शनमध्ये कावासाकी निन्जा एच२ (Kawasaki Ninja H2), हार्ले डेव्हिसन फॅटबॉय (Harley-Davidson Fatboy), डुकाटी १०९८ (Ducati 1098), आणि यामाहा आरडी ३५० (Yamaha RD350) यांचा समावेश आहे.

वाचा - पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत

महेंद्रसिंग धोनी केवळ एक महान क्रिकेटपटूच नाही, तर एक यशस्वी व्यावसायिक आणि गुंतवणूकदार म्हणूनही त्याने स्वतःला सिद्ध केले आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२४इंडियन प्रिमियर लीग २०२५पैसा