Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! युरोपसोबत उद्याच डीलची घोषणा, पण पुढील वर्षाची वाट बघावी लागणार...; अमेरिकेला धोबीपछाड देण्यास का विलंब...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 21:21 IST

Mother of all deals India EU latest Update: वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार (FTA) पूर्ण झाल्याची घोषणा केली. उद्या २७ जानेवारीला अधिकृत घोषणा होणार. सविस्तर वाचा.

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज, २६ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीत ही महत्त्वाची माहिती दिली. या कराराला दोन्ही बाजूंनी 'मदर ऑफ ऑल डील्स' (सर्व करारांची जननी) असे संबोधले जात असून, उद्या २७ जानेवारी रोजी होणाऱ्या भारत-EU शिखर परिषदेत याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, दोन्ही बाजूंच्या वाटाघाटी यशस्वीपणे पार पडल्या असून कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. सध्या या कराराच्या मजकुराची कायदेशीर छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण ५ ते ६ महिने लागतील. कायदेशीर प्रक्रियेनंतर या वर्षाच्या उत्तरार्धात करारावर अधिकृत स्वाक्षरी होईल आणि २०२७ च्या सुरुवातीला हा करार प्रत्यक्षात लागू होण्याची शक्यता आहे.

हा करार भारत आणि युरोपियन युनियनमधील सुमारे २ अब्ज लोकांच्या बाजारपेठेसाठी द्वार उघडणार आहे. राजेश अग्रवाल यांच्या मते, हा करार भारतासाठी 'संतुलित आणि भविष्योन्मुखी' आहे. यामुळे केवळ व्यापारच नाही, तर युरोपियन गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात भारतात येईल.

जागतिक राजकारणावर परिणामअमेरिकेच्या वाढत्या व्यापार शुल्कामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत आणि EU मधील हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, जे या कराराचे धोरणात्मक गांभीर्य स्पष्ट करते.

English
हिंदी सारांश
Web Title : India-EU Trade Deal Announced, but Implementation Delayed; Setback for US?

Web Summary : India and EU successfully concluded trade negotiations, with official announcement tomorrow. Legal review delays implementation until 2027. This deal, a 'mother of all deals', opens doors to vast markets.
टॅग्स :टॅरिफ युद्धनरेंद्र मोदीअर्थसंकल्प २०२६