Monte Carlo Success story: मोंटे कार्लो (Monte Carlo) हे नाव ऐकल्यावर अनेकांना तो एखादा परदेशी ब्रँड वाटतो, मात्र वस्तुस्थिती अशी आहे की हा पूर्णपणे भारतीय ब्रँड असून त्याचे संपूर्ण कामकाज लुधियाना येथून चालतं. १९८४ मध्ये जेव्हा पंजाबमधील परिस्थिती अत्यंत नाजूक होती, तेव्हा जवाहर लाल ओसवाल यांनी या कंपनीची पायाभरणी केली. त्यावेळी भारतीय बाजारपेठ असंघटित होती आणि लोक एकतर टेलरकडून कपडे शिवून घेत किंवा महागड्या परदेशी ब्रँड्सचे स्वप्न पाहत. ओसवाल वूलन मिल्स लिमिटेडद्वारे रशिया आणि युरोपमध्ये स्वेटरची निर्यात होत असताना, तशीच उच्च दर्जाची उत्पादनं भारतीयांना का मिळत नाहीत, या विचारातून जवाहर लाल यांनी एका स्वदेशी प्रीमियम ब्रँडचे स्वप्न पाहिलं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'मोंटे कार्लो' नाव ठेवण्यामागची रंजक कहाणी
ब्रँडचे नाव 'मोंटे कार्लो' ठेवण्यामागे एक खास मानसशास्त्र होतं. १९८० च्या दशकात भारतीय ग्राहकांचा ओढा परदेशी गुणवत्तेकडे जास्त होता. मोंटे कार्लो हा युरोपमधील मोनॅको देशातील एक अत्यंत श्रीमंत आणि आलिशान भाग आहे, जो हाय-क्लास लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो. जवाहर लाल ओसवाल यांना हवं होतं की, जेव्हा एखादा भारतीय ग्राहक हे नाव ऐकेल, तेव्हा त्याच्या मनात युरोपियन फॅशन आणि लक्झरीची प्रतिमा तयार व्हावी. त्यांनी केवळ नावच परदेशी ठेवले नाही, तर कपड्यांचे फिनिशिंग, पॅकेजिंग आणि दर्जाही आंतरराष्ट्रीय स्तराचा राखला. यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक लोकांना हा परदेशी ब्रँड वाटला, जो कंपनीच्या प्रतिमेसाठी फायदेशीर ठरला.
१ एप्रिलपासून लागू होणार बजेटच्या सर्व घोषणा, तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम; काय-काय बदलणार, पाहा
ऑल-सीजन फॅशनकडे वळण्याचा निर्णय
सुरुवातीच्या काळात लुधियानामध्ये बनवलेला स्वेटर परदेशी ब्रँड्सच्या तोडीचा असू शकतो, हे दुकानदारांना पटवून देणं कठीण होते. जवाहर लाल स्वतः फॅक्टरीमध्ये तासनतास घालवून धाग्याच्या विणकामावर लक्ष द्यायचे. त्यांनी इटलीहून आधुनिक मशिनरी मागवून घेतली. मोंटे कार्लोच्या प्रवासातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट तेव्हा आला, जेव्हा त्यांनी केवळ हिवाळ्यापुरते मर्यादित न राहता 'ऑल-सीजन' कपडे बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी टी-शर्ट, शर्ट आणि ट्रउझर्सच्या बाजारपेठेत प्रवेश केला. २००० च्या दशकात जेव्हा भारतात मॉल संस्कृती वाढू लागली, तेव्हा मोंटे कार्लोने स्वतःला एक प्रीमियम लाईफस्टाईल ब्रँड म्हणून यशस्वीपणे प्रस्थापित केलं.
कंपनीची आर्थिक स्थिती आणि सद्यस्थिती
मोंटे कार्लो फॅशन्स लिमिटेड ही भारतीय शेअर बाजारात लिस्टेड कंपनी आहे. १७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कंपनीचे मार्केट कॅप १,२०९.६१ कोटी रुपये असून शेअर ५९० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये या शेअरने ८३३ रुपयांचा उच्चांक गाठला होता. कंपनीच्या विक्रीबद्दल बोलायचं झालं तर, मार्च २०२३ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने १,११७.७१ कोटी रुपयांची विक्री केली होती. २०२४ मध्ये ही विक्री १,०६१.९१ कोटी रुपये आणि २०२५ मध्ये १,१००.४१ कोटी रुपये राहिली.
वारसा आणि भविष्यातील विस्तार
आज जवाहर लाल ओसवाल सुमारे ८३ वर्षांचे आहेत आणि आता त्यांच्या व्यवसायाची धुरा त्यांचे सुपुत्र संदीप ओसवाल आणि नातवंडे सांभाळत आहेत. आता हा ब्रँड केवळ कपड्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून, होम फर्निशिंग आणि ॲक्सेसरीजच्या क्षेत्रातही उतरला आहे. लुधियानाच्या एका छोट्या ऑफिसपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका आलिशान कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत पोहोचला आहे. एका कुटुंबाची अनेक दशकांची मेहनत आणि लुधियानाच्या गल्ल्यांमध्ये पाहिलेलं स्वप्न यामुळेच आज मोंटे कार्लो भारतीय मध्यमवर्गीयांना लक्झरीचा अनुभव करून देत आहे.
Web Summary : Monte Carlo, a completely Indian brand from Ludhiana, was founded in 1984. It expanded from woolens to all-season fashion, becoming a premium lifestyle brand. Listed on the stock exchange, it boasts over ₹1000 crore in sales and is now managed by the next generation, venturing into home furnishings.
Web Summary : लुधियाना का मोंटे कार्लो, एक भारतीय ब्रांड, की स्थापना 1984 में हुई। यह ऊनी कपड़ों से सभी मौसम के फैशन में विस्तारित हुआ, और एक प्रीमियम जीवनशैली ब्रांड बन गया। शेयर बाजार में सूचीबद्ध, इसकी बिक्री ₹1000 करोड़ से अधिक है और अब अगली पीढ़ी द्वारा प्रबंधित, होम फर्निशिंग में कदम रख रहा है।