Join us

Money: श्रीमंत होताहेत अतिश्रीमंत; ते पैसा गुंतवतात तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 06:24 IST

Money: जगात अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, सर्वाधिक अतिश्रीमंत लोकसंख्या भारतात तयार होत असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

नवी दिल्ली : जगात अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, सर्वाधिक अतिश्रीमंत लोकसंख्या भारतात तयार होत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. तीन कोटी डॉलर्सहून अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींना अतिश्रीमंत व्यक्ती म्हटले जाते. हे  अतिश्रीमंत लोक नेमके त्यांचे पैसे कशामध्ये गुंतवतात हे जाणून घेऊ....

५०० पेक्षा अधिक संपत्ती व्यवस्थापक, कौटुंबिक कार्यालये आणि खासगी बँकर्सच्या एकत्रित २.५ ट्रिलियन डॉलर मालमत्तेचे अल्ट्रा हाय नेट वर्थ (यूएचएनडब्ल्यू) ने सर्वेक्षण केले असून, यात जगातील सर्वांत श्रीमंत लोक त्यांचे पैसे कसे गुंतवतात हे जाणून घेतले आहे. 

शेअर बाजारात किती गुंतवणूक? -पहिले आणि सेकंडरी घर घेण्यामध्ये अतिश्रीमंत ३२ टक्के गुंतवणूक करतात. ३.७% अतिश्रीमंतांकडे स्वत:चे घर आहे. शेअर बाजारांमध्ये अतिश्रीमंतांच्या संपत्तीचा जवळपास २० टक्के समावेश आहे. - ही गुंतवणूक अमेरिकेतील समभागांमध्ये सर्वाधिक आहे. अमेरिकेतील बाजारांत ३३%, युरोप २८%, तर आशियातील शेअर बाजारांमध्ये २६% गुंतवणूक अतिश्रीमंतांची आहे.

५,७९,००० लोक जगभरात असे होते ज्यांची संपत्ती २०२२ मध्ये ३ कोटी डॉलर्सहून अधिक होती. ७,४४,०००  (२९ टक्के)नी जगभरात पुढील पाच वर्षांत अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.यांचे बंगले कुठ-कुठे?  - न्यूयॉर्क, टोकियो आणि सॅन फ्रान्सिस्को

जी वस्तू खरेदी केली, ती फायदा देऊन गेली...अतिश्रीमंत खरेदी करत असलेल्या वस्तूंचे मूल्य आव्हानात्मक आर्थिक स्थिती असतानाही वाढलेले आहे. २०२२ मध्ये एसअँडपी ५०० १९ टक्क्यांनी कोसळले असतानाही अतिश्रीमंत व्यक्ती खरेदी करत असलेल्या वस्तूंचे मूल्य वाढले. कलात्मक वस्तूंच्या किमती गेल्या वर्षी २९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. लक्झरी कार्स २५ टक्क्यांनी, तर घड्याळ्यांच्या किमती १८ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

 

टॅग्स :पैसा