Join us

गुडन्यूज... मोबाईल रिचार्ज वैधता आता २८ ऐवजी ३० दिवसांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 09:06 IST

ट्रायच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक दूरसंचार कंपनीने रिचार्ज  वैधता २८ दिवसांऐवजी ३० दिवस देणे आवश्यक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ग्राहकांच्या हिताचा मोठा निर्णय घेत दूरसंचार कंपन्यांना २८ दिवसांऐवजी ३० दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लान जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

ट्रायच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक दूरसंचार कंपनीने रिचार्ज  वैधता २८ दिवसांऐवजी ३० दिवस देणे आवश्यक आहे. जर ग्राहकाला या प्लानचे पुन्हा रिचार्ज करायचे असेल तर ते सध्याच्या प्लानच्या तारखेपासून करू शकतात, अशी तरतूद असावी, असे ‘ट्राय’ने म्हटले आहे. कंपन्या महिनाभर रिचार्ज प्लान देत नसल्याची तक्रार वापरकर्त्यांनी केली होती.

टॅग्स :मोबाइलट्राय