Join us  

MobiKwik नं लाँच केलं 'होम क्रेडिट मनी', आता १० हजार रुपयांपर्यंतचे मिळेल इंटरेस्ट फ्री लोन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 8:11 PM

Home Credit Money : देशातील सर्वात मोठे डिजिटल वॉलेटपैकी एक असलेल्या मोबिक्विकने कंझ्युमर फायनान्स प्रोव्हायडर होम क्रेडिट इंडियाच्या सहकार्याने होम क्रेडिट मनी लाँच केले आहे.

नवी दिल्ली : तुम्ही मोबाईल, डीटीएच रिचार्ज करण्यासाठी, पाणी व वीज बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुकिंग किंवा ऑनलाइन ऑर्जरसाठी मोबिक्विक वॉलेट वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता देशातील सर्वात मोठे डिजिटल वॉलेटपैकी एक असलेल्या मोबिक्विकने कंझ्युमर फायनान्स प्रोव्हायडर होम क्रेडिट इंडियाच्या सहकार्याने होम क्रेडिट मनी लाँच केले आहे.

१० हजार रुपयांपर्यंतचे मिळेल इंटरेस्ट फ्री लोनहोम क्रेडिट मनीअंतर्गत, मोबिक्विक युजर्सना १० हजार रुपयांपर्यंतचे इंटरेस्ट फ्री लोन ऑफर करण्यात येत आहे. मोबिक्विकचा असा दावा आहे की, त्यांच्या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना इंस्टंट लोन मिळेल.

२,४०,००० रुपयांपर्यंतच्या पर्सनल लोनचे सुद्धा फायदेहोम क्रेडिट ग्रुप युरोप आणि आशिया ९ देशांमध्ये पसरलेला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, होम क्रेडिट मनी युजर्सना १,५०० ते १० हजार रुपयांपर्यंतचे इंस्टंट इंटरेस्ट फ्री लोन घेण्यासाठी ऑफर करण्यात येत आहेत, ते थेट त्यांच्या होम क्रेडिट मनी वॉलेटमध्ये जातील. याशिवाय, ग्राहक २,४०,००० रुपयांपर्यंतचे पर्सनल लोनही घेऊ शकतात. मात्र, यावर व्याज द्यावे लागणार आहे. तुम्ही ईएमआयद्वारे ही रक्कम परत करु शकता.

२,४०,०० रुपये कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच, तुमच्याकडे मोबिक्विक अकाऊंटचे केवायसी असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. याशिवाय, तुम्ही लोन घेण्यासाठी अर्ज करु शकणार नाही. 

टॅग्स :पैसाडिजिटलऑनलाइनव्यवसाय