Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी वाढला, राकेश झुनझुनवालांना 215 कोटी रुपयांचा फायदा झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 01:41 IST

या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांना सुमारे 215 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू असतानाच, दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा हिस्सा असलेल्य मेट्रो ब्रँड्सने जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे. मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात जबरदस्त परतावा दिला आहे. मेट्रो ब्रँडचा शेअर गेल्या एका महिन्यात 515.05 रुपयांवरून 570.05 रुपयांवर पोहोचला आहे. 

या कालावधीत मेट्रो ब्रँड्सचा शेअर 55 रुपये किंवा 10.7 टक्क्यांनी वाढला आहे. या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांना सुमारे 215 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

मेट्रो ब्रँड्समध्ये राकेश झुनझुनवालाची हिस्सेदारी - मेट्रो ब्रँड्सच्या मार्च 2022 तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांनी आपली पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या माध्यमाने नुकत्याच लिस्ट झालेल्या या फुटवेअर स्टॉकमध्ये इनव्हेस्टमेंट केली होती. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँड्सचे 3,91,53,600 एवढे शेअर अथवा, 14.43 टक्के हिस्सेदारी आहे. मेट्रो ब्रँड्स शेअरची 52 आठवड्यांतील लो-लेव्हल 426.10 रुपये आहेत. तर, हाई-लेव्हल 673 रुपये एवढी आहे. 

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजारशेअर बाजार