Join us

जगातील दाेन श्रीमंत व्यक्तींची भेट; हाॅटेलचे बिल काेणी दिले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 07:26 IST

मस्क यांची मालमत्ता १९ लाख काेटी, तर अरनाॅल्ट यांची संपत्ती १६.५४ लाख काेटी एवढी आहे. 

पॅरिस : जगातील दाेन सर्वात श्रीमंत व्यक्ती इलाॅन मस्क आणि बर्नार्ड अरनाॅल्ट यांची पॅरिसमध्ये भेट झाली. मस्क आणि अरनाॅल्ट यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत माहिती मिळाली नाही.

या भेटीदरम्यान मस्क यांची आई मेय मस्क आणि अरनाॅल्ट यांची मुले ॲंटाेनी आणि एलेक्झांडर हे उपस्थित हाेते. त्यांनी एकत्र भाेजनही केले. उद्याेगपती आनंद महिंद्र यांनी ट्विट करत म्हटले की, माझी पत्नी विचारतेय, जेवणाचे बिल काेणी दिले? तर आणखी एकाने ट्विट केले की, काेणीतरी रेस्टाॅरंट विकत घेतले असेल.

मस्क यांची मालमत्ता १९ लाख काेटी, तर अरनाॅल्ट यांची संपत्ती १६.५४ लाख काेटी एवढी आहे. 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कव्यवसाय