Join us
Daily Top 2Weekly Top 5

नमिता थापर यांच्या 'एमक्योर'चा मास्टरस्ट्रोक! वजन कमी करण्याचे इंजेक्शन ५५% स्वस्त, नवीन किंमत आवाक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:39 IST

Emcure Pharma Share Price : एमक्योर फार्मास्युटिकल्स ही नमिता थापर यांच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीने वजन घटवण्याचे औषध परवडणाऱ्या किमतीत आणले आहे.

Emcure Pharmaceuticals : भारतात वाढती लठ्ठपणाची समस्या लक्षात घेता, पुण्यातील दिग्गज औषध कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने वजन घटवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जाणाऱ्या 'पोविझट्रा' या औषधाच्या किमतीत तब्बल ५५ टक्क्यांची कपात केली आहे. या निर्णयामुळे आता जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेली ही थेरपी भारतीय रुग्णांसाठी अधिक परवडणारी होणार आहे.

किमतींचा 'डाऊनफॉल'एमक्योरने 'पोविझट्रा'च्या सर्व डोसच्या किमतीत सरासरी ४७% कपात केली असून, ३ एप्रिल २०२६ पासून हे नवीन दर लागू झाले आहेत.

तपशील जुनी किंमत (प्रति महिना) नवी किंमत (प्रति महिना)एकूण कपात
Poviztra (0.25 mg) ८,७९०३,९९९ | ५५%
साप्ताहिक खर्च -९९९ -

काय आहे 'पोविझट्रा' आणि त्याचा वापर?

  • सेमाग्लूटाइड इंजेक्शन: हे एक 'सेमाग्लूटाइड' इंजेक्शन असून, ते आठवड्यातून एकदा 'पेन डिव्हाइस'द्वारे दिले जाते.
  • उपलब्ध डोस: हे औषध ०.२५ मिग्रॅ पासून ते २.४ मिग्रॅ पर्यंतच्या विविध डोसमध्ये उपलब्ध आहे.
  • प्रमाणित उपचार: वजन कमी करण्यासाठी जगभरात क्लिनिकलदृष्ट्या सिद्ध झालेले हे मॉलिक्युल्स असून, आता ते भारतातील मोठ्या वर्गापर्यंत पोहोचवण्याचे एमक्योरचे उद्दिष्ट आहे.

वाचा - OTP चं टेन्शन संपणार, आता SIM बदलताच ब्लॉक होणार बँक अकाऊंट; पाहा काय आहे नवं सायलेंट ऑथेंटिकेशन

शेअर बाजारात 'सोमवारी' तेजीची शक्यता'शार्क टँक इंडिया' फेम नमिता थापर यांच्या एमक्योर फार्माची ही मोठी घोषणा अशा वेळी आली आहे जेव्हा शेअर बाजार 'गुड फ्रायडे' निमित्त बंद आहे. कंपनी जुलै २०२४ मध्ये १,९५२ कोटींच्या आयपीओसह लिस्ट झाली होती. सध्या कंपनीचे बाजार भांडवल २९,३०० कोटींहून अधिक आहे. शुक्रवारी शेअरचा भाव १,५४८.३० रुपयांवर होता. गेल्या वर्षभरात या शेअरने ४६% तर सहा महिन्यांत १८% परतावा दिला आहे. पोविझट्राच्या किमतीतील कपातीमुळे विक्री वाढण्याची अपेक्षा असून, सोमवार ६ एप्रिल रोजी शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येऊ शकते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Namita Thapar's Emcure Slashes Weight Loss Drug Price by 55%

Web Summary : Emcure Pharma reduces Poviztra's price by 55%, making the weight loss injection more affordable in India. The price cut, effective April 3, 2026, aims to combat rising obesity. Share prices may rise after the announcement.
टॅग्स :वेट लॉस टिप्सऔषधंऔषधं