Share Market Today : येत्या रविवारी, १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७'च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात सावधगिरीचे वातावरण पाहायला मिळाले. गेल्या तीन सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीला आज खीळ बसली. जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि नफा वसुलीमुळे सेन्सेक्स २९६.५९ अंकांनी घसरून ८२,२६९.७८ वर बंद झाला, तर निफ्टी ९८.२५ अंकांच्या घसरणीसह २५,३२०.६५ वर स्थिरावला.
आठवडाभरात १ टक्क्यांची कमाईशुक्रवारी जरी बाजारात घसरण झाली असली, तरी संपूर्ण आठवड्याचा विचार करता गुंतवणूकदारांसाठी हा काळ फायदेशीर ठरला. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सुमारे १-१ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. आजच्या सत्रात सेन्सेक्स एका वेळी ६०० अंकांनी कोसळला होता. मात्र, अखेरच्या तासात झालेल्या काही अंशी खरेदीमुळे नुकसान थोडे भरून निघाले.
क्षेत्रीय निर्देशांकात 'मेटल'चा अक्षरशः चुराडा
- आजच्या सत्रात सर्वात मोठा फटका मेटल क्षेत्राला बसला. निफ्टी मेटल इंडेक्स तब्बल ५ टक्क्यांनी कोसळला.
- घसरण झालेली क्षेत्रे : बँकिंग, आयटी, तेल आणि वायू, आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये ०.५ ते १ टक्क्यांची कमजोरी दिसली.
- तेजी दाखवलेली क्षेत्रे : फार्मा, मीडिया, एफएमसीजी आणि ग्राहक उपयोगी वस्तू क्षेत्रात ०.७ ते १.८ टक्क्यांची सुधारणा झाली.
सेंसेक्समधील 'टॉप गेनर्स' आणि 'टॉप लूजर्स'सेंसेक्समधील ३० पैकी १३ शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा १.३८ टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानी राहिले. त्यापाठोपाठ एसबीआय, आयटीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर्स वधारले. दुसरीकडे, टाटा स्टील सर्वाधिक ४.५७ टक्क्यांनी घसरले. आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा या शेअर्समध्येही १.३ ते २.१ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
वाचा - क्रिप्टो मार्केटमध्ये 'भूकंप'! १५ लाख कोटींचा चुराडा; 'बिटकॉइन'सह 'इथेरियम' ५% हून अधिक कोसळले
बाजाराचे 'इंटर्नल' चित्र सकारात्मक?निर्देशांक जरी लाल निशाणीत बंद झाले असले, तरी बीएसईवर एकूण ४,३६७ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी २,४२४ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १,७८१ शेअर्समध्ये घसरण झाली. विशेष म्हणजे, ७८ शेअर्सनी आज आपला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला.
Web Summary : Share market cautious before budget. Sensex and Nifty fell amid profit booking, though weekly gains remained positive. Metal sector saw a significant drop, while pharma showed gains.
Web Summary : बजट से पहले शेयर बाजार सतर्क। मुनाफावसूली के बीच सेंसेक्स और निफ्टी में गिरावट, साप्ताहिक लाभ सकारात्मक रहा। धातु क्षेत्र में गिरावट, फार्मा में लाभ दिखा।