Join us

३ दिवसांच्या रिकव्हरीनंतर पहिले पाढे पंचावन्न! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, या सेक्टरला सर्वाधिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:07 IST

Share Market : शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ४२३.४९ अंकांनी (०.५५%) घसरून ७६,६१९.३३ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, NSE चा निफ्टी 50 निर्देशांक देखील आज 108.61 अंकांच्या (0.47%) घसरणीसह 23,203.20 अंकांवर बंद झाला.

Share Market : सप्ताहाच्या पहिल्या २ दिवसात झालेल्या घसरणीनंतर पुढील ३ दिवस बाजारात चांगली रिकव्हरी झाली. गुंतवणूकदारांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. शुक्रवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स ४२३.४९ अंकांच्या (०.५५%) घसरणीसह ७६,६१९.३३ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, NSE चा निफ्टी ५० निर्देशांक देखील आज १०८.६१ अंकांच्या (०.४७%) घसरणीसह २३,२०३.२० अंकांवर बंद झाला.

कोणत्या सेक्टरमध्ये चांगली वाढ?एफएमसीजी आणि फार्मा शेअर्समध्ये आज वाढ झाली. तेल आणि वायू, रियल्टी, मेटलही तेजीत होते. सर्वात मोठी घसरण आयटी आणि खासगी बँकांच्या शेअर्समध्ये दिसून आली. याशिवाय NBFC समभागही मोठ्या तोट्यासह बंद झाले. बीपीसीएल, रिलायन्स, कोल इंडिया, हिंदाल्को, नेस्ले इंडिया हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर इन्फोसिस, ॲक्सिस बँक, श्रीराम फायनान्स, कोटक बँक, विप्रो हे सर्वाधिक घसरले. रेल्वेच्या शेअर्समध्ये वाढ झाली. RVNL +4%, TITAGARH +3%, IRFC +2% आणि RITES +1% सह बंद झाले.

देशांतर्गत शेअर बाजारातील व्यवहार सकाळी कमजोरीने सुरू झाले. सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आणि नंतर तोटा ४५० अंकांपर्यंत वाढला. निफ्टीही १०० अंकांनी घसरला होता. बँक निफ्टी ४०० अंकांपर्यंत घसरला होता. सुरुवातीच्या काळात, सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत २७ अंकांनी वाढून ७७,०६९ वर उघडला खरा पण थोड्याच वेळात घसरला. निफ्टी ३४ अंकांनी घसरून २३,२७७ वर उघडला. बँक निफ्टी ३१९ रुपयांनी घसरून ४८,९५९ वर उघडला.

बाजार का घसरला?शुक्रवारी इन्फोसिस आणि अ‍ॅक्सिस बँकेने बाजाराचे सेंटीमेंट खराब केले. दोन्ही समभागांमध्ये मोठी घसरण झाली. अ‍ॅक्सिस बँकेच्या घसरणीनंतर ही कमजोरी इतर बँकांमध्ये दिसून येईल, अशी भीती बाजाराला आहे. आज पुन्हा एकदा बँक निफ्टीमध्ये दबाव दिसून आला. बँकिंग क्षेत्रातील हेवीवेट शेअर्स आज दबावाखाली आहेत.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी