प्रसाद गो. जोशी -कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी अद्यापही अर्थव्यवस्था फारसा वेग घेत नाही. त्याचप्रमाणे परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली विक्री आणि कमी झालेला पीएमआय यामुळे बाजाराची चिंता वाढली आहे. यामुळे गत सप्ताहात शुक्रवारचा अपवाद वगळता बाजारात घसरण झाली. त्यामुळे सप्ताहामध्ये प्रमुख निर्देशांक घसरले असले तरी स्मॉल कॅप निर्देशांकामध्ये मात्र वाढ झाली आहे.
गतसप्ताहातील स्थितीनिर्देशांक बंद मूल्य बदलसेन्सेक्स ५२,४८४.६७ - ४४०.३८निफ्टी १५,७२२.२० - १३८.१५मिडकॅप २२,५०५.८२ - ४३.८३स्मॉलकॅप २५,५६७.२६ ४२०.९६