Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:01 IST

Market Crash : १३ फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजारांचे निर्देशांक झपाट्याने खाली बंद झाले, निफ्टी ५० हा निर्देशांक २५,५०० च्या खाली बंद झाला, त्यातही विक्रीचा प्रचंड दबाव होता.

Market Crash : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या तुफान विक्रीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात हाहाकार पाहायला मिळाला. सत्राच्या सुरुवातीपासूनच विक्रीचा दबाव राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. व्यवहाराच्या शेवटी मुंबई शेअर बाजारचानिर्देशांक सेन्सेक्स १०४८.१६ अंकांनी कोसळून ८२,६२६.७६ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी ३३६.१ अंकांनी घसरून २५,४७१.१० च्या पातळीवर स्थिरावला.

सर्वच क्षेत्रांत विक्रीचा 'हाहाकार'आजच्या घसरणीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ आयटीच नव्हे, तर जवळपास सर्वच क्षेत्रांतील शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. सर्वाधिक फटका उर्जा, धातू आणि रिअल्टी निर्देशांकात २ ते ३ टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली. इतर क्षेत्रात आयटी, एफएमसीजी, टेलिकॉम, ऑटो आणि पॉवर इंडेक्समध्येही १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ब्रॉडर मार्केटमध्येही गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक २ टक्क्यांनी खाली आले.

घसरणीचे मानकरी आणि काही अपवादसेंसेक्समधील ३० पैकी २८ कंपन्यांचे शेअर्स लाल निशानमध्ये (तोट्यात) बंद झाले. सर्वाधिक नुकसान हिंडाल्को, हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी एंटरप्रायझेस आणि ओएनजीसीचे झाले. तर या पडझडीतही बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयशर मोटर्स आणि सिप्ला यांनी हिरव्या निशाणमध्ये बंद होत गुंतवणूकदारांना थोडा दिलासा दिला.

रुपया ऐतिहासिक निचांकाकडे?शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम चलनाच्या मूल्यावरही दिसून आला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ३ पैशांनी कमकुवत होऊन ९०.६४ वर बंद झाला. परकीय बाजारात डॉलर मजबूत झाल्याने आणि भारतीय शेअर बाजारातील नकारात्मक ट्रेंडमुळे रुपयावर दबाव वाढला. शुक्रवारी रुपया ९०.६९ वर उघडला आणि दिवसात त्याने ९०.७९ च्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

वाचा - ॲपलला 'सिरि'चा फटका! एकाच दिवसात १८ लाख कोटी रुपये पाण्यात; २०२६ मधील सर्वात मोठी घसरण

जागतिक चिंतेचे सावटअमेरिकेतील मजबूत डॉलर आणि वाढत्या व्याजदरांच्या चिंतेमुळे जागतिक गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारपेठांमधून पैसे काढून घेत आहेत. आयटी शेअर्समधील विक्रीचा दबाव सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिल्याने भारतीय बाजाराची धारणा पूर्णपणे बिघडली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Black Friday on Market: Sensex Plunges; Investors Lose Billions

Web Summary : Indian stock market crashed amid global concerns and IT sector sell-off. Sensex fell over 1000 points. Investors suffered significant losses across sectors. Rupee weakened.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी