Stock Market : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आलेली तेजी दुसऱ्याच दिवशी ओसरली असून, भारतीय शेअर बाजारात आज मोठी 'त्सुनामी' पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत केलेल्या एका आक्रमक विधानामुळे जागतिक बाजारासह दलाल स्ट्रीटवरही हाहाकार माजला आहे. आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले आहेत.
सर्वच सेक्टर 'लाल' निशाणात
- सेन्सेक्स : १,३९१.८२ अंकांच्या (१.९०%) घसरणीसह ७१,७४२.५० च्या पातळीवर आला.
- निफ्टी ५० : ४३१.२५ अंकांनी (१.९०%) लु़ढकून २२,२४८.१५ वर पोहोचला.
- क्षेत्रीय निर्देशांक: निफ्टी पीएसयू बँक, रियल्टी, फार्मा, ऑटो आणि मेटल यांसारखे सर्वच प्रमुख इंडेक्स २ टक्क्यांहून अधिक कोसळले आहेत.
गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा फटका
बुधवारी बीएसई वरील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४२२ लाख कोटी रुपये होते, ते आज थेट ४१३ लाख कोटी रुपयांवर खाली आले आहे. म्हणजेच, अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ते' विधान आणि युद्धाचा भडकाया पडझडीचे मुख्य कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ट्रुथ सोशल' वरील विधान आणि राष्ट्राला उद्देशून केलेले संबोधन.
- आक्रमक पवित्रा : ट्रम्प यांनी म्हटले की, इराणमधील अमेरिकेची उद्दिष्टे जवळपास पूर्ण झाली आहेत. परंतु, पुढील दोन-तीन आठवडे इराणवर अधिक तीव्र आणि आक्रमक हल्ले केले जातील.
- सीजफायरचा दावा फेटाळला: इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी 'सीजफायर'ची मागणी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता, जो इराणने त्वरित फेटाळून लावला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा 'खोटा आणि निराधार' असल्याचे म्हटले आहे.
- तणाव वाढला: या विधानांमुळे पश्चिम आशियातील तणाव लवकर संपण्याची चिन्हे मावळली आहेत, ज्याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे.
वाचा - नोकरकपातीला 'AI' जबाबदार की कंपन्यांचा आर्थिक हावरेपणा? ओरेकलमधील कपातीचे खरे वास्तव वेगळंच!
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Trump's aggressive stance on Iran sparked a global market downturn. Indian stock markets plummeted, with investors losing ₹9 lakh crore. All sectors traded in red, fueled by fears of escalating tensions in West Asia.
Web Summary : ईरान पर ट्रंप के आक्रामक रुख से वैश्विक बाजार में गिरावट आई। भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट हुई, निवेशकों को ₹9 लाख करोड़ का नुकसान हुआ। पश्चिम एशिया में बढ़ते तनाव के कारण सभी सेक्टर लाल निशान पर कारोबार कर रहे हैं।