Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 08:27 IST

Company Market Cap: शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी गेल्या आठवडा खूपच वाईट ठरला. या काळात, देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकूण ३,६३,४१२.१८ कोटी रुपयांची मोठी घसरण नोंदवण्यात आली.

Company Market Cap: शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी गेल्या आठवडा खूपच वाईट ठरला. या काळात, देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकूण ३,६३,४१२.१८ कोटी रुपयांची मोठी घसरण नोंदवण्यात आली. दुसरीकडे, उर्वरित ३ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकूण ४१,५९८.९९ कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक घट झाली, तर आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट कॅपमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात बीएसईचा (BSE) बेंचमार्क इंडेक्स २,१८५.७७ अंकांच्या (२.५४ टक्के) मोठ्या घसरणीसह बंद झाला होता.

गेल्या आठवड्यात या कंपन्यांचं नुकसान

गेल्या आठवड्यात नुकसान सोसलेल्या कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), भारती एअरटेल, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि लार्सन अँड टुब्रो या नावांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे.

रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण

शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप १,५८,५३२.९१ कोटी रुपयांनी घसरून १९,९६,४४५.६९ कोटी रुपयांवर आलं. एचडीएफसी बँकेचं मार्केट कॅप ९६,१५३.६१ कोटी रुपयांनी घसरुन १४,४४,१५०.२६ कोटी रुपये झालं. भारती एअरटेलचं मार्केट कॅप ४५,२७४.७२ कोटी रुपयांनी घसरून ११,५५,९८७.८१ कोटी रुपये झालं आणि बजाज फायनान्सचे मार्केट कॅप १८,७२९.६८ कोटी रुपयांनी कमी होऊन ५,९७,७००.७५ कोटी रुपयांवर आलं.

टीसीएसला १५,२३२.१४ कोटींचा फटका

याशिवाय, लार्सन अँड टुब्रोचं मार्केट कॅप १८,७२८.५३ कोटी रुपयांनी घसरून ५,५३,९१२.०३ कोटी रुपये झालं आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं (TCS) मार्केट कॅप १५,२३२.१४ कोटी रुपयांनी कमी होऊन ११,६०,६८२.४८ कोटी रुपयांवर आलं. तर इन्फोसिसचं मार्केट कॅप १०,७६०.५९ कोटी रुपयांनी घटून ६,७०,८७५ कोटी रुपयांवर आले.

आयसीआयसीआय बँकेसा 'अच्छे दिन'

दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेचे व्हॅल्युएशन ३४,९०१.८१ कोटी रुपयांनी वाढून १०,०३,६७४.९५ कोटी रुपये झालं. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या मार्केट कॅपमध्ये ६,०९७.१९ कोटी रुपयांची वाढ झाली आणि ते ५,५७,७३४.२३ कोटी रुपये झालं. या काळात भारतीय स्टेट बँकेचे मार्केट कॅप ५९९.९९ कोटी रुपयांनी वाढून ९,२३,०६१.७६ कोटी रुपये झालं.

English
हिंदी सारांश
Web Title : Market Cap of Top Companies Plummets; Reliance Faces Biggest Loss

Web Summary : Indian stock markets faced a downturn. Seven of ten major companies saw a significant decrease in market cap, totaling ₹3.63 lakh crore. Reliance Industries experienced the largest losses, while ICICI Bank showed growth. BSE's index also fell sharply.
टॅग्स :रिलायन्सइन्फोसिस