Join us

अनेक सणवार, एप्रिल महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, एवढे दिवस राहणार काम बंद, आताच करा नियोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 16:31 IST

Bank Holidays In April 2023: अनेक सणवारांमुळे एप्रिल महिन्यात जवळपास १० ते ११ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. या सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे आहे

चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ आता अखेरच्या टप्प्यात आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात २०२३-२४ पासून काही मोठे बदल होणार आहेत. हे बदल पैसे आणि बँकांशी संबंधित आहेत. सर्व बँक ग्राहकांना एप्रिल २०२३ मध्ये असलेल्या सुट्ट्यांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. तुम्हीही एप्रिल महिन्यामध्ये काही मोठ्या बँक व्यवहारांचे नियोजन करत असाल तर तुम्हाला बँकांना असलेल्या सुट्ट्यांची माहिती असणं आवश्यक आहे. अनेक सणवारांमुळे एप्रिल महिन्यात जवळपास १० ते ११ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे.

बँकांचे सर्व व्यवहार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नियंत्रित होत असतात. तसेच सुट्ट्यांची यादीही रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतरच समोर येते. दरम्यान, एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची सुरुवात ही १ एप्रिलपासून होईल. यादिवशी आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर ४ एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी असेल. त्यानंतर ७ एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी असेल. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी असेल. तर २२ एप्रिल रोजी रमजान ईदची सुट्टी असेल. त्याशिवाय २, ९, १६, २३ आणि ३० एप्रिल रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल. तर ८ आणि २२ एप्रिल रोजी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुट्टी असेल.

मात्र या संपूर्ण महिनाभरात बँकांच्या कामकाजाशी संबंधित कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. एटीएम, कॅश डिपॉझिट, ऑनलाइन बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून या दरम्यान, काम सुरू राहील.

एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे१ एप्रिल (शनिवार) बँक अकाऊंटचं वार्षिक क्लोजिंग२ एप्रिल (रविवार)  साप्ताहिक सुट्टी ४ एप्रिल (मंगळवार) महावीर जयंती७ एप्रिल (शुक्रवार) गुड फ्रायडे ८ एप्रिल (शनिवार) महिन्यातील दुसरा शनिवार९  एप्रिल (रविवार) साप्ताहिक सुट्टी१४ एप्रिल (शुक्रवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती१६ एप्रिल (रविवार) साप्ताहिक सुट्टी २२ एप्रिल (शनिवार) रमजान ईद, दुसरा शनिवार२३ एप्रिल (रविवार) साप्ताहिक सुट्टी३० एप्रिल (रविवार) साप्ताहिक सुट्टी 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रभारतीय रिझर्व्ह बँकभारत