Join us  

दोन लाख नोकऱ्यांवर गदा; वाहन क्षेत्रात दोन दशकांतील सर्वात मोठी मंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 4:11 AM

प्रवासी वाहनांच्या विक्रीत आठ महिन्यांत मोठी घसरण

मुंबई : कारच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून, दोन दशकांतील ही सर्वात मोठी मंदी असल्याचे सांगितले जात आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत आठ महिन्यांत मोठी घसरण झाली आहे. मेमध्ये ही विक्री २०.५५ टक्के इतकी घसरली आहे. त्यामुळे या क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, तर गत तीन महिन्यांत किरकोळ विक्रेत्यांनी जवळपास दोन लाख कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.मुंबईमधील एका कार डीलरने सांगितले की, पूर्वी दिवसात १५ ते २० कारसाठी बुकिंग होत होते. मात्र, आज ही बुकिंग ३ ते ५ कारवर आली आहे. अर्थातच, कार विक्रीच्या मंदीचा फटका या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाल्याने देशभरात वाहन डीलर कर्मचाऱ्यांची कपात करीत आहेत. उद्योग संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (फाडा) असा दावा केला आहे की, गत तीन महिन्यांत किरकोळ विक्रेत्यांनी जवळपास दोन लाख कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.निकटच्या भविष्यात यात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे आणखी काही शोरूम बंद होऊ शकतात, तसेच नोकर कपात सुरू राहू शकते. फाडाचे अध्यक्ष आशिष हर्षराज काळे यांनी सांगितले की, विक्रीत घट झाल्याने डीलर्सकडे कर्मचाऱ्यांच्या कपातीचाच पर्याय उरलेला आहे. वाहन उद्योगाला दिलासा देण्यासाठी सरकारने जीएसटीत कपात करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चिंता वाढवणारी आकडेवारी30% घट जुलैमध्ये प्रवासी वाहन विक्रीत2016 मधील नोटाबंदी, जीएसटीचे नवे चढते दर, उबेर, ओलाचा प्रवेश, संथ ग्रामीण अर्थव्यवस्था ही कारणे.15000 डीलर्सकडून संचलित 26000 वाहने शोरूममध्ये18 महिन्यांत एप्रिलपर्यंत 271 शहरांत 286 शोरूम्स बंद; 32000 लोकांची यात नोकरी गेली2,00,000 लोकांची कपात होण्याती शक्यता

टॅग्स :वाहनवाहन उद्योग