Join us

लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा! टेक कंपनी मायक्रोसॉफ्टशी करणार करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:26 IST

AI Training For Ladki Bahin: अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.

 Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. निवडवणुकीत दिलेल्या आश्वासने अर्थसंल्पात पूर्ण होणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० रुपयांचं आश्वासनाची पूर्तता आज होणार का? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. पण, त्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 

राज्यात परकीय गुंतवणूक वाढली : अर्थमंत्रीराज्यात परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या काळात राज्यात ४० लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट आहे. रोजगारामध्ये वाढ होऊन उत्पन्न होत आहे. ५० लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य राज्य सरकारने ठेवलं आहे. त्यासाठी नवे कामगार नियम तयार केले जाणार आङे. देशाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा १५.४ टक्के आहे.  लवकरच महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण जाहीर केलं जाणार आहे. सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र उभारणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

येत्या पाच वर्षात वीज खरेदीत १ लाख ५ हजार कोटींची बचत होईल. अर्थात वीज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांसाठी येत्या ५ वर्षात विक्रमी गुंतवणूक केली जाणार आहे. 

लाडक्या बहिणींना मिळणार एआयचं प्रशिक्षणलाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. टेक कंपनी मायक्रोसॉफ्टशी राज्य सरकार करार करणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2025लाडकी बहीण योजनाअजित पवारदेवेंद्र फडणवीसअर्थसंकल्प 2024आर्टिफिशिअल इंटेलिजन्स