लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोक जलद आणि विश्वासार्ह व्यवहारांसाठी आता यूपीआयवर अधिक अवलंबून असल्याचे दिसत आहे. यातही यूपीआय व्यवहारांत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, एकूण व्यवहारांमध्ये महाराष्ट्राचा वाटा ८.८० टक्के राहिला आहे. महाराष्ट्रात २,११,४३३.६२ कोटी रुपयांचे व्यवहार जून २०२५ मध्ये झाले असून, दुसऱ्या क्रमांकांवरील कर्नाटक राज्याच्याही तुलनेत महाराष्ट्रात ५६.७९ टक्के अधिक व्यवहार झाले आहेत.
यूपीआय व्यवहारांसाठी फोन पे, गुगल पे आणि पेटीएमचा सर्वाधिक वापर केला जात आहे. यूपीआय व्यवहारांसाठी सरकारी बँकांचा वापर केला जात असला तरी ॲपवरून व्यवहार करण्यासाठी खासगी बँकांची ॲप अग्रेसर आहेत. यातही एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक बँकेची ॲप आघाडीवर आहेत, असे एनपीसीआयने म्हटले आहे.
सर्वाधिक यूपीआय व्यवहार कोणत्या ॲपवरून? फोन पे ११,९९,६९०गुगल पे ८,४०,९३१पेटीएम १,३४,१७१नवी २१,८१४सुपरमनी ७,७१६क्रेड ५१,३८४
यूपीआयचा सर्वाधिक वापर कुठेमहाराष्ट्र ८.८० % कर्नाटक ५.६१ % उत्तर प्रदेश ५.१५ तेलंगणा ४.९४ % तामिळनाडू ४.३७ % राजस्थान २.९१ % मध्य प्रदेश २.१७ %
कोणत्या व्यवहारांसाठी वापर ?किराणा आणि सुपर मार्केट्स ६३,३०७.९८फास्ट फूड रेस्टॉरंट्स १३,५११.२१जेवणाची ठिकाणे आणि रेस्टॉरंट्स १८,२१७.२०दूरसंचार सेवा १९,९४६.५०सर्व्हिस स्टेशन ३५,९०९.८५डिजिटल साहित्य : गेम ९,७४९.९६सिगारेटची दुकाने आणि स्टॉल १,८३०.३७बेकरी ३,८८२.८९