Join us  

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live : श्रीनगर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय, पर्यटकांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 1:01 PM

राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. राज्याची ...

27 Feb, 24 02:53 PM

महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिकांच्या रकमेत १० पटींची वाढ.

महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिकांच्या रकमेत १० पटींची वाढ. सुवर्ण पदकासाठी १ कोटी. रौप्य पदकासाठी ७५लाख,  कांस्य पदकासाठी ५० लाख देण्यात येणार. क्रीडा विभासाठी ५३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

27 Feb, 24 03:01 PM

मेडिकल कॉलेजेसची उभारणी होणार

वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा येथे १०० प्रवेश क्षमतेचे मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहेत. याशिवाय वर्धा, बुलढाणा, अंबरनाथ, पालघर, नाशिकमध्येही मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहेत.

27 Feb, 24 03:00 PM

सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये

सन 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये व महसुली खर्च 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये,  महसुली तूट- 9 हजार 734 कोटी रुपये, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपये 

27 Feb, 24 02:53 PM

गृहनिर्माण विभागासाठी १३४७ कोटी रुपयांची तरतूद

गृहनिर्माण विभागासाठी १३४७ कोटी रुपयांची तरतूद. दिव्यांग कल्याण विभागासाठी १५२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

27 Feb, 24 02:50 PM

मेडिकल कॉलेजेसची उभारणी होणार

वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा येथे १०० प्रवेश क्षमतेचे मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहेत. याशिवाय वर्धा, बुलढाणा, अंबरनाथ, पालघर, नाशिकमध्येही मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहेत.

27 Feb, 24 02:47 PM

श्रीनगर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय

कोकण विभागात पर्यटनाला चालना देण्यासाठी शिवकालीन ३२ गडकिल्ल्यांचं नुतनीकरण आणि संवर्धन करण्यात येणार. राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना किफायतशीर दरात उत्तम सुविधेसाठी श्रीनगर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. यासाठी मोक्याच्या ठिकाणी जागा ठरवण्यात आल्या असून ७७ कोटींची सुविधा करण्यात आली आहे.

27 Feb, 24 02:44 PM

संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शनमध्ये वाढ

संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता १ हजार रुपयांऐवजी १५०० रुपयांचं पेन्शन देण्यात येणार आहे. याशिवाय संत गाडगेबाबा महामंडळ स्थापन करण्यात येईल.

27 Feb, 24 02:42 PM

कोल्हापूर, सांगलीत पूर रोखण्यासाठी २३०० कोटी रुपयांची तरतूद

कोल्हापूर, सांगलीत पूर रोखण्यासाठी २३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सागरमाला योजनेंतर्गत रेडिओ क्लब जेट्टीसाठी २२९ कोटींची तरतूद.

27 Feb, 24 02:36 PM

शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप योजनेची सुरुवात करण्यात येणार

शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. या अंतर्गत ८ लाख ५० हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

27 Feb, 24 02:31 PM

महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग,  प्रकल्पांसाठी १५५५४ कोटी रुपयांची तरतूद

महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग,  प्रकल्पांसाठी १५५५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा स्वच्छता विभागाला ३८५५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. उद्योग विभागाला १ हजार २१ कोटींची तरतूद 

27 Feb, 24 02:28 PM

७ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं सरकारचं लक्ष्य

ऊर्जा विभागासाठी ११९३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ७ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं सरकारचं लक्ष्य आहे. 

27 Feb, 24 02:26 PM

८ लाख सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार

१ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे. ८ लाख सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ३०० युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार.

27 Feb, 24 02:22 PM

निर्यात वाढीसाठी ५ इंडस्ट्रियल पार्कची तरतूद

मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, निर्यात वाढीसाठी ५ इंडस्ट्रियल पार्कची तरतूद. दावोसमध्ये ९९ कंपन्यांसाठी करार झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

27 Feb, 24 02:20 PM

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू - अजित पवार

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करण्यात आलं आहे. याशिवाय रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

27 Feb, 24 02:19 PM

विकास धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली - अजित पवार

विकास धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. रत्नागिरीतील भागवत बंदरासाठी ३०० कोटींचा  निधी, याशिवाय सामान्य प्रशासन विभागासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूरद करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले

27 Feb, 24 02:17 PM

नवी मुंबईतील विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ मध्ये

वस्त्रोद्योग धोरणांतर्गत प्रत्येक रेशन कार्डावर साडी वाटपाचं काम हाती घेण्यात आलंय. नवी मुंबईतील विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ मध्ये सुरू होणार. 

27 Feb, 24 02:15 PM

७५००किमी रस्त्याची कामं हाती घेतली जाणार

राज्यातील गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. ७५००किमी रस्त्याची कामं हाती घेतली जातील. याशिवाय भारतातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

27 Feb, 24 02:13 PM

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू - अजित पवार

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करण्यात आलं आहे. याशिवाय रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

27 Feb, 24 02:10 PM

११ गडकिल्ल्यांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रस्ताव

ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार ठाण्यापर्यंत करणार. याशिवाय ११ गडकिल्ल्यांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रस्ताव असल्याचं अजित पवार म्हणाले.

27 Feb, 24 02:08 PM

केंद्राकडून जीएसटीची रक्कम मिळाली

राज्यात सहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसंच केंद्राकडून जीएसटीचे ८६१६ कोटी रुपये मिळाले, असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. 

27 Feb, 24 02:06 PM

जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं असून जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

27 Feb, 24 02:03 PM

राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरूवात, अजित पवारांकडून अंतरिम अर्थसंकल्पाचं वाचन

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाला सुरूवात झाली असून अर्थमंत्री अजित पवारांकडून वाचन सुरू करण्यात आलं आहे. कुसुमाग्रजांना अभिवादन करून अर्थसंकल्पाला सुरुवात.

27 Feb, 24 01:16 PM

आता ८,६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, साखर कारखान्यांसाठी २०० कोटी

वित्त खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पाचदिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गतवर्षी हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या ५५,५२०.७७ कोटी रुपयांच्या तुलनेत ८,६०९.१७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. यातील ५,५५६.४८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या अनिवार्य खर्चासाठी, तर २,९४३.६९ कोटी रुपये विविध कार्यक्रमांच्या खर्चासाठी आहेत. यात शासनाने हमी घेतलेल्या विविध सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जप्रकरणी राज्य सहकारी बँकेला अदा करण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कोणत्या विभागाला किती तरतूद?

वित्त १,८७१.६३ कोटी
महसूल १,७९८.५८ कोटी
ऊर्जा १.३७७.४९ कोटी
विधी, न्याय १,३२८.८७ कोटी
नगरविकास १,१७६.४२ कोटी
नियोजन २७६.४२ कोटी
गृह २७८.८४ कोटी
कृषी व पशुसंवर्धन २०४.७६ कोटी
सार्वजनिक कार्य ९५.४८ कोटी
(आकडे रुपयांत)

27 Feb, 24 01:07 PM

अजित पवार आज मांडणार राज्याच्या अर्थसंकल्प, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुकांची घोषणा होणार असल्यानं हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2024अजित पवारएकनाथ शिंदेविधानसभा