चंद्रशेखर बर्वे -
नवी दिल्ली : बेरोजगारीचा मुद्दा देशभरात चिंतेचा विषय असतानाच २०१५ पासून ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना’ (पीएमकेव्हीवाय) अंतर्गत देशभरात १.६ कोटींपेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, फक्त २४.३ लाख युवकांना नोकरी मिळाली आहे. म्हणजेच प्रशिक्षित युवकांपैकी १५ टक्क्यांपेक्षा कमी जणांना रोजगार मिळाला आहे. महाराष्ट्रातही हे प्रमाण कमी असल्याची माहिती केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
आकडेवारी काय सांगते? राज्य प्रशिक्षितांची संख्याउत्तर प्रदेश २५,०६,४३८राजस्थान १४,०६,९४३महाराष्ट्र १३,३१,३८५मध्य प्रदेश १२,१३,२५०तामिळनाडू ८,८५,१३४राज्य नोकरी मिळालेल्यांची संख्याउत्तर प्रदेश ३,३८,६३४मध्य प्रदेश २,२०,११५राजस्थान १,८४,००४तामिळनाडू १,७१,७९४हरयाणा १,५८,९५१पंजाब १,२८,९०५बिहार १,२६,७८२
नोकरी देण्यात महाराष्ट्र देशात कोणत्या स्थानी?लोकसभेत लेखी उत्तरात कौशल्य विकासमंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने २०१५-१६ मध्ये तरुणांना वेगवेगळ्या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी पीएमकेव्हीवाय योजना सुरू केली होती.
कौशल प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंरतु, नोकरी देण्यात फार मागे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०१५-१६ ते ३० जून २०२५ पर्यंत महाराष्ट्रात १३ लाख ३१ हजार ३८५ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, यातील फक्त ८० हजार ९५० तरुणांनाच नोकरी मिळू शकली. राष्ट्रीय क्रमवारीत महाराष्ट्र ११ व्या स्थानी येतो.