Join us

‘हितसंबंध’ बघूनच माधवी बूच यांनी स्वत:ला वेगळे केले; ‘हिंडेनबर्ग’प्रकरणी सेबीने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 07:15 IST

अदानी समूहानेही सर्व दावे खाेडून काढले आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने केलेल्या दाव्यांत ‘सेबी’च्या अध्यक्ष माधवी पुरी बुच व त्यांचे पती धवल यांच्यावर आराेप केले आहेत. मात्र, बूच यांनी हे आराेप निराधार आणि चारित्र्यहनन करणारे असल्याचे म्हटले आहे. तर, बूच यांनी वेळाेवेळी संबंधित माहिती दिलेली असून संभाव्य हितसंबंधांचा मुद्दा विचारात घेऊन अशा प्रकरणांपासून त्यांनी स्वत:ला वेगळे ठेवले, असे ‘सेबी’ने स्पष्ट केले आहे. अदानी समूहानेही सर्व दावे खाेडून काढले आहेत.

हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालात बूच दाम्पत्य तसेच सेबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते. यावर सेबीने उत्तर दिले असून याप्रकरणी २६ पैकी एक मुद्दा वगळता सर्व मुद्द्यांवर तपास पूर्ण झालेला आहे. १२ हजार पानांची ३०० हून अधिक कागदपत्रे तपासण्यात आली आहेत.

राहुल गांधींचे तीन प्रश्न

  1. लाेकसभेतील विराेधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर तीन प्रश्न उपस्थित केले. १. ‘सेबी’ प्रमुखांचा राजीनामा का दिला नाही?
  2. गुंतवणूकदारांनी पैसे गमाविले तर ही जबाबदारी काेणाची आहे? 
  3. सर्वाेच्च न्यायालय यासंदर्भात स्वत:हून दखल घेणार का?
टॅग्स :सेबी