नवी दिल्ली: भारतातील मोबाइल उत्पादन क्षेत्राने मोठी झेप घेतली असून २०२४ मध्ये भारतातून अमेरिकेला झालेल्या स्मार्टफोन निर्यातीने १५८ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ नोंदवली आहे. ‘मेड इन इंडिया’ टॅग असलेल्या उत्पादनांची वाढती मागणी आणि पीएलआय योजनेमुळे भारत स्मार्टफोन उत्पादनातील जागतिक केंद्र होत आहे.
‘मेड इन इंडिया’ची झेप
- २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांत अमेरिकेच्या स्मार्टफोन आयातीपैकी ३६% स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’.
- जानेवारी-मे २०२५ मध्ये २.१३ कोटी स्मार्टफोन भारतातून अमेरिकेत निर्यात.
- केवळ पाच महिन्यांतच भारताची ७८,००० कोटी रुपयांची निर्यात.
भारतात तयार झालेले आयफोन मॉडेल्स
आयफोन १२आयफोन १३आयफोन १४आयफोन १५
भारतातील आयफोन निर्मिती कंपन्या
फॉक्सकॉन, पेगेट्रॉन, विस्ट्रॉन
स्मार्टफोन निर्यातीतील चीनचा वाटा घटला
२०२४ मधील ८२% वरून २०२५ मध्ये फक्त ४९%.