Join us

परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:34 IST

India Made Chinese Phones: भारतात तयार होणाऱ्या फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना परदेशात मोठी मागणी आहे. चिनी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी भारतातून निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.

India Made Chinese Phones: भारतात तयार होणाऱ्या फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना परदेशात मोठी मागणी आहे. चिनी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी भारतातून निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. या कंपन्या मीडल ईस्ट, आफ्रिका आणि अगदी अमेरिकेतही ते पाठवत आहेत. पूर्वी या बाजारपेठांमध्ये चीन आणि व्हिएतनाममधून वस्तू येत होत्या. पण आता भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि येथील उत्पादन क्षमता वाढल्यामुळे हे घडत आहे.

इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो मोबाइल इंडियानं आर्थिक वर्ष २०२४ मध्ये (FY24) प्रथमच निर्यातीतून २७२ कोटी रुपयांचं परकीय चलन कमावलं आहे. तर, रियलमी मोबाइल टेलिकम्युनिकेशन्सनं (इंडिया) ११४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कंपन्यांनी १२ मे रोजी रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला (आरओसी) ही माहिती दिली. आर्थिक वर्ष २०२५ चे निकाल येणे बाकी आहे. टेलिव्हिजन आणि होम अप्लायन्सेस विकणाऱ्या सर्वात मोठ्या चिनी कंपन्यांपैकी एक असलेल्या हायसेन्स ग्रुपनं पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत भारतात बनवलेल्या वस्तूंची निर्यात करण्याची योजना आखली आहे.

SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही

चिनी कंपन्यांसाठी मोठा बदल

चिनी कंपन्यांसाठी हा मोठा बदल आहे. आतापर्यंत ते भारतातच माल विकत होते. पण २०२० मध्ये चीनसोबत सीमेवर झालेल्या वादानंतर सरकारनं चिनी कंपन्यांबाबत आणखी कठोर निर्णय घेतले. चिनी कंपन्यांनी भारतातच उत्पादन करावं, अशी सरकारची इच्छा आहे. सरकारनं चिनी कंपन्यांना भारतीय कंपन्यांसोबत सहकार्य करून उत्पादन करण्यास सांगितलं आहे. त्यांनी भारतातच वितरण आणि निर्यातीचं काम करावं. तसंच, त्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर भारतीयांची नियुक्ती करावी, असंही सांगण्यात आलंय.

१०० कोटींचा प्रकल्प

हायसेन्सचे स्थानिक प्रॉडक्शन पार्टनर ईपॅक ड्युरेबलचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंघानिया यांनी ते श्री सिटीमध्ये हायसेन्ससाठी १०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार असल्याची माहिती दिली. हा प्लांट हायसेन्सच्या चिनी प्लांटसारखाच असेल. त्याचे डिझाईन आणि सर्व काही सारखंच असेल, असं त्यांनी सांगितलं.

लेनोव्हो ग्रुप भारतातून सर्व्हर आणि लॅपटॉप निर्यात करण्याच्या तयारीत आहे. त्यांची स्मार्टफोन कंपनी मोटोरोला आधीच हे डिव्हाइस अमेरिकेला निर्यात करते. डिक्सन टेक्नॉलॉजीज मोटोरोलाच्या फोनची निर्मिती करते. निर्यातीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी डिक्सन आता आपली क्षमता ५० टक्क्यांनी वाढवत आहे. डिक्सन चिनी कंपनी ट्रान्सियन होल्डिंग्ससाठी स्मार्टफोनदेखील बनवते. ट्रान्सियन इंटेल, टेक्नो आणि इनफिनिक्स सारख्या ब्रँडची निर्मिती करते. आफ्रिकेत त्याची निर्यात सुरू झाली आहे.

भारत सरकारचीही मदत

काही निर्यात योजनांना भारत सरकारच्या पीएलआय योजनेतून मदत केली जात आहे. पीएलआय योजनेचा अर्थ सरकार कंपन्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देते. बहुतेक चिनी ब्रँड पीएलआयचा भाग नाहीत, परंतु डिक्सनसारखे त्यांचे काही कंत्राटी उत्पादक या योजनेचा फायदा घेत आहेत. एका मोठ्या थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मालकानं, सरकार बऱ्याच दिवसांपासून चिनी कंपन्यांना भारतातून निर्यात करण्यास सांगत असल्याचं म्हटलं. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर अद्याप सुरू न झालेले उर्वरित चिनी ब्रँडही लवकरच सुरू होतील, असं सांगितलं.

टॅग्स :भारतचीनस्मार्टफोन