Join us
Daily Top 2Weekly Top 5

LPG बाबत सरकारचा मोठा निर्णय; 'हे' काम पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:02 IST

सर्वांसाठी बंधनकारक आहे का? जाणून घ्या...

LPG New Rule : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारतातील LPG पुरवठा खंडित झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने LPG ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी (e-KYC) करणे आवश्यक असणार आहे. सरकारच्या या निर्णयानुसार, पडताळणी पूर्ण न केल्यास बुकिंग असूनही सिलेंडरची सप्लाय रोखली जाऊ शकते.

सरकारचा स्पष्ट इशारा

केंद्र सरकारने स्पष्ट केले की, एलपीजी सेवा आणि सबसिडीचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी आधार बायोमेट्रिक पडताळणी करणे अनिवार्य आहे.  पडताळणी न केल्यास सिलेंडर बुकिंग असूनही सप्लाय मिळणार नाही. तसेच, सबसिडीवरही परिणाम होऊ शकतो.

जागतिक परिस्थितीचा परिणाम

इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत मोठ्या प्रमाणात LPG अडकून पडल्याने भारतातही पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. यामुळे ओव्हरबुकिंग आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असून, याद्वारे पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न आहे.

घरबसल्या पडताळणीची सुविधा

सरकारने ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन घरबसल्या पडताळणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक आधार फेस RD अ‍ॅप किंवा संबंधित तेल कंपन्यांचे अधिकृत मोबाइल अ‍ॅप वापरून e-KYC पूर्ण करू शकतात.

सर्वांसाठी बंधनकारक आहे का?

सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ही प्रक्रिया सर्व ग्राहकांसाठी बंधनकारक नाही. ज्या ग्राहकांनी आधीच बायोमेट्रिक पडताळणी केली आहे, त्यांना पुन्हा करण्याची गरज नाही. ज्यांनी अद्याप पडताळणी केलेली नाही, त्यांच्यासाठीच हे आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : New LPG Rule: No Cylinder Without Aadhaar e-KYC Completion

Web Summary : Government mandates Aadhaar e-KYC for LPG supply amidst global disruptions. Failure to comply may halt cylinder delivery and impact subsidies. Existing KYC-verified customers are exempt; others can complete verification via mobile apps.
टॅग्स :एलपीजी गॅस टंचाईइंधन टंचाई