Join us
Daily Top 2Weekly Top 5

LPG गॅस सिलिंडरच्या e-KYC चा संभ्रम मिटला! सरकारकडून स्पष्टीकरण; कोणाला आहे गरज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:40 IST

LPG e-KYC : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सामान्य एलपीजी ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी एक नवीन स्पष्टीकरण जारी केले आहे.

LPG e-KYC : गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस ग्राहकांमध्ये ई-केवायसी प्रक्रियेवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. गॅस एजन्सीबाहेर लागणाऱ्या रांगा आणि पसरणाऱ्या अफवा लक्षात घेता, केंद्र सरकारने आता यावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. ई-केवायसी हा कोणताही 'नवीन नियम' नसून ही एक नियमित प्रक्रिया असल्याचे सरकारने म्हटले आहे. 

नेमकी कोणाला गरज आहे?

  • सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ज्या ग्राहकांनी अद्याप एकदाही आपली बायोमेट्रिक ओळख पटवलेली नाही, केवळ त्यांच्यासाठीच ही प्रक्रिया आवश्यक आहे. 
  • जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी नसाल आणि आधीच एकदा ई-केवायसी केले असेल, तर तुम्हाला ते पुन्हा करण्याची गरज नाही. 
  • उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना प्रत्येक आर्थिक वर्षात एकदा ई-केवायसी करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया प्रामुख्याने ७ सिलेंडर रिफिल केल्यानंतर ८ व्या आणि ९ व्या सिलेंडरवर मिळणारी सबसिडी सुरळीत सुरू राहण्यासाठी गरजेची असते.

सबसिडी थांबणार का?नागरिकांमधील सर्वात मोठी भीती म्हणजे ई-केवायसी न केल्यास सबसिडी बंद होईल का? सरकारने स्पष्ट केले आहे की, ई-केवायसी पूर्ण नसली तरीही सबसिडीच्या उपलब्धतेवर कोणताही परिणाम होणार नाही. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश केवळ बनावट लाभार्थी शोधणे, गॅसचा काळाबाजार रोखणे आणि खऱ्या पात्र ग्राहकांची ओळख पटवणे हा आहे.

गॅस एजन्सीला जाण्याची गरज नाही; घरबसल्या करा e-KYCगॅस एजन्सीमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारने 'फेस ऑथेंटिकेशन'द्वारे घरी बसून ई-केवायसी करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे.

अशी आहे सोपी प्रक्रिया

  1. ॲप डाऊनलोड करा : तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप आणि 'Aadhaar FaceRD' हे ॲप डाऊनलोड करा.
  2. गॅस कनेक्शनला जोडलेल्या मोबाईल नंबरच्या मदतीने लॉग-इन करा.
  3. ॲपमधील 'e-KYC' पर्यायावर क्लिक करून आधार नंबर टाका.
  4. 'Aadhaar FaceRD' ॲपद्वारे तुमचा चेहरा स्कॅन करा.
  5. चेहरा पडताळणी यशस्वी झाल्यावर तुमचे ई-केवायसी आपोआप पूर्ण होईल आणि सिस्टममध्ये अपडेट होईल.

वाचा - गुंतवणूकदारांनो सावधान! जगातील सर्वात मोठा 'मार्केट क्रॅश' जवळ? कियोसाकींनी सांगितले श्रीमंत होण्याचे सूत्र

ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा ई-केवायसीसाठी कोणालाही ओटीपी शेअर करू नका. फसवणुकीपासून सावध राहा. 

English
हिंदी सारांश
Web Title : LPG e-KYC confusion cleared! Government clarifies who needs it.

Web Summary : Government clarifies LPG e-KYC is not a new rule. Only those without prior biometric verification need it. Ujjwala beneficiaries require yearly e-KYC for continued subsidy. No subsidy cuts if e-KYC is pending. Do it at home via face authentication.
टॅग्स :एलपीजी गॅस टंचाईअमेरिका-इस्रायल-इराण वॉरइंधन टंचाईसरकार