vinay hiremeth : तुम्हाला जर सांगितलं, की एका अब्जाधीश व्यक्तीने आपली ८३,००० हजार कोटी रुपयांची कंपनी विकून आता इंटर्नशीप करणार आहे. तर तुमचा विश्वास बसेल का? पण, ही घटना सत्य आहे. ऑनलाइन मोफत स्क्रीन रेकॉर्डिंग टूल्स पुरवणाऱ्या स्टार्टअप लूमचे सह-संस्थापक विनय हिरेमठ यांनी त्यांची कंपनी २ वर्षांपूर्वी Atlassian ला ८३०० कोटी रुपयांना विकली होती. या डीलमधून त्यांना ५०-७० दशलक्ष डॉलर्स मिळाले. पण, इतके पैसे असूनही विनय इंटर्नशीपच्या शोधात आहे. सध्या कुठूनही उत्पन्न मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना इंटर्नशिप करायची आहे. विशेष म्हणजे, अटलासियनने हिरेमठ यांना ६ कोटी डॉलरचा रिटेन्शन बोनस देऊ केला होता, जो त्याने नाकारला.
विनय हिरेमठ आजकाल भौतिकशास्त्रात खूप रस घेत आहेत. दररोज ५ ते ८ तास या विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, "माझी कंपनी विकल्यानंतर, मी एका विचित्र परिस्थितीत आहे, जिथे मला पुन्हा कधीही काम करावे लागणार नाही. तरीही, या स्वातंत्र्याचे काय करावे याबद्दल मी संभ्रमात आहे. खरे सांगायचे तर, मी आयुष्याबद्दल फार आशावादी नाही.”
अभियांत्रिकी क्षेत्रात इंटर्नशिप शोधत आहेतविनय हिरेमठ यांनी मनीवाइज पॉडकास्टमध्ये सांगितले की, त्यांना रोबोटिक्स आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये इंटर्नशिप करायची आहे. "मी काही स्टार्टअप्समध्ये, विशेषतः रोबोटिक्स कंपन्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून इंटर्नशिप शोधत असल्याचे त्यांनी सांगितले". एवढेच नाही तर त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्येही रस आहे. या क्षेत्रातील भविष्यातील शक्यता देखील ते शोधत आहे.
विनय हिरेमठ यांचा प्रवास कसा आहे?विनय हिरेमठ यांचा जन्म १९९१ मध्ये झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय, अर्बाना-चॅम्पेन येथे अभ्यासाला सुरुवात केली. परंतु, दोन वर्षांनी शिक्षण सोडले. यानंतर ते कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे गेले. काही काळानंतर, त्यांनी सिलिकॉन व्हॅलीमधील बॅकप्लेन या स्टार्टअपमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. तेथे त्यांची भेट शहेद खानशी झाली. त्यांनी मिळून लूमची (Loom) स्थापना केली. लूमचे सह-संस्थापक आणि माजी CTO म्हणून त्यांनी २० कोटी डॉलर उभे केले. त्यांच्या नेतृत्वाखाली लूमच्या वापरकर्त्यांची संख्या ३ कोटींहून अधिक झाली. २०२३ मध्ये लूमची विक्री करण्यात आली.