Join us
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019: समाजाभिमुख उद्योजक विशाल अग्रवाल यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 17:00 IST

आर.सी. प्लास्टो टॅन्क्स् अ‍ॅण्ड पाइप्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विशाल अग्रवाल यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने अग्रवाल यांचा सन्मान करण्यात आला.

मुंबई - उद्योजक म्हणजे फक्त पैशांच्या मागे लागणारी व्यक्ती, असा एक ठोकताळा आपल्या मनात असतो. पण एक उद्योजक म्हणून मोठे होत असताना समाजासाठी कार्य करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. यामधीलच एक आहेत आर.सी. प्लास्टो टॅन्क्स् अ‍ॅण्ड पाइप्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विशाल अग्रवाल. या कार्याबद्दल 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने अग्रवाल यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात अग्रवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

आर. सी. प्लास्टो टॅन्कस् अ‍ॅण्ड पाइप्स प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील टॅन्क (टाकी) उत्पादन क्षेत्रातील मोठी कंपनी होय. १९९९ मध्ये या क्षेत्रात कंपनीने पदार्पण केले. वॉटर स्टोअरेज टॅन्कस्, पाइप्स आणि फिटिंगसह सर्वोत्कृष्ट दर्जाची प्लास्टिक उत्पादने तयार करणारी ही एक मोठी कंपनी अहे. संचालक विशाल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीने २ हजार रोजगारांची निर्मिती करून ३० टक्के संयुक्त वार्षिक वृद्धीदराने (सीएजीआर) अत्यंत थोड्या अवधीत कंपनीची उलाढाल ५०० कोटींवर नेली. उत्पादनासाठी कंपनीकडे आयातीत आधुनिक यंत्रसामग्री आहे. विश्वास संपादन करून ग्राहकांना खुश करणे हे कंपनीचे ध्येय आहे. एक हजार कोटींची गुंतवणूक करून तीन नवीन मोठे प्रकल्प सुरू करण्याचा या समूहाचा इरादा आहे. 

विशाल अग्रवाल यांनी प्लास्टिक इंडस्ट्रीजचा दोन दशकांचा अनुभव आहे. नेहमी उत्साही राहणारे विशाल अग्रवाल यांचा नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून सांघिक सहकार्यातून प्रगतीसाठी सदोदित उत्तजेन देण्यात पुढाकार असतो. प्रेरक मार्गदर्शक म्हणून ते विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहेत. विदर्भातील विविध औद्योगिक संघटनांचे त्यांनी नेतृत्व केले असून, उद्योजक संघटनेचे ते सक्रिय सदस्य आहेत.

हे होतं परीक्षक मंडळकेंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.

टॅग्स :महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019महाराष्ट्र