Join us

आता निवृत्तीचे टेन्शन नाही, LIC च्या 'या' पॉलिसीत पैसे गुंतवल्यास आयुष्यभर मिळेल पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 14:09 IST

LIC : एलआयसीच्या वेबसाइटनुसार, 40 वर्षांवरील कोणीही ही पॉलिसी खरेदी करू शकतो, तर कमाल वयोमर्यादा 80 वर्षे आहे.

नवी दिल्ली : सरकारी जीवन विमा कंपनी एलआयसीने (LIC) बाजारात आपली सर्वात शानदार पेन्शन (Pension) पॉलिसी सुरू केली आहे. 1 मार्च 2022 पासून सुरू झालेल्या सरल पेन्शन पॉलिसीत (Saral Pension) एकवेळ गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर (Retirement) आजीवन पेन्शन मिळू शकेल. 

एलआयसीच्या वेबसाइटनुसार, 40 वर्षांवरील कोणीही ही पॉलिसी खरेदी करू शकतो, तर कमाल वयोमर्यादा 80 वर्षे आहे. हे पती-पत्नी दोघांसाठी एकत्रितपणे खरेदी केले जाऊ शकते, ज्यामध्ये 60 वर्षांनंतर पेन्शन सुरू होईल. जोपर्यंत जोडीदारांपैकी एक जिवंत आहे तोपर्यंत निवृत्ती वेतन दिले जाईल आणि दोघांच्या अनुपस्थितीत, जमा केलेला निधी नामांकित व्यक्तीला परत केला जाईल.

पेन्शन पॉलिसी खरेदी करणाऱ्याला कंपनीच्या वतीने पेमेंटसाठी चार पर्याय दिले जातात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही दरमहा पेन्शन घेऊ शकता किंवा ही रक्कम त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावरही घेता येईल. पॉलिसीअंतर्गत, तुम्हाला कमाल मर्यादा नसताना किमान 1,000 हजार मासिक पेन्शन दिली जाईल. जितकी जास्त रक्कम तुम्ही पॉलिसीमध्ये गुंतवाल तितकी जास्त पेन्शन दिली जाईल.

कंपनीने बनवले प्राइस बँड- सर्वात कमी रकमेची विमा योजना 2 रुपयांच्या खाली येईल.- दुसरी किंमत 2 लाख ते 5 लाख रुपये असेल.- तिसर्‍या प्राइस बँडमध्ये तुम्ही 5 लाख ते 10 लाखांची पॉलिसी खरेदी करू शकता.- चौथ्या प्राइस बँडमध्ये 10 लाख ते 25 लाखांपर्यंत गुंतवणूक असेल.- शेवटची पॉलिसी 25 लाखांपेक्षा जास्त असेल.

पॉलिसीवर कर्जाची सुविधासरल पेन्शन योजनेची पॉलिसी खरेदी केल्यानंतर 6 महिन्यांनंतरच कंपनीच्या वतीने कर्जाची सुविधा उपलब्ध होईल. तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनच्या आधारावर कर्जाची रक्कम ठरवली जाईल. कर्जावरील व्याज तुम्हाला मिळणार्‍या पेन्शनच्या 50 टक्के पेक्षा जास्त नसावे. ज्वाइंट योजनेत, कर्ज फक्त पहिल्या लाभार्थ्याला दिले जाईल आणि त्याच्या अनुपस्थितीत, दुसरा लाभार्थी कर्ज घेण्यास सक्षम असेल.

पॉलिसी सरेंडर केली तर....कंपनीद्वारे पॉलिसीमध्ये नमूद केल्यानुसार गंभीर आजारामुळे जर सरेंडर केली, तर कंपनी एकूण निधी मूल्याच्या 95 टक्के रक्कम देईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही 10 लाख रुपयांची पॉलिसी केली असेल, तर सरेंडर केल्यावर तुम्हाला 9.5 लाख रुपये परत मिळतील. मात्र, जर त्यावर कर्ज घेतले असेल, तर कर्जाची मूळ रक्कम आणि व्याज तुम्हाला वजा केले जाईल.

टॅग्स :एलआयसीनिवृत्ती वेतनपैसाव्यवसाय