Join us

अदानी समूहाचे शेअर्स आपटल्यामुळे LIC ला ५६ हजार काेटी रुपयांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 08:18 IST

८२,९७० काेटी रुपये मूल्य हाेते एलआयसीच्या गुंतवणुकीचे ३१ डिसेंबर २०२२ राेजी २७,००० काेटी रुपयांपेक्षा कमी मूल्य झाले

नवी दिल्ली - अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा एलआयसीला माेठा फटका बसला आहे. सततच्या घसरणीमुळे एलआयसीने समूहात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे २७ हजार काेटी रुपयांपेक्षा कमी झाले आहे. ते खरेदीमूल्यापेक्षाही कमी झाले आहे, म्हणजेच ही गुंतवणूक ताेट्यात गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, एलआयसीने समूहातील गुंतवणूक विकलेली नाही. हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर समूहातील कंपन्यांचे शेअर्स आपटले आहेत.

८२,९७० काेटी रुपये मूल्य हाेते एलआयसीच्या गुंतवणुकीचे ३१ डिसेंबर २०२२ राेजी २७,००० काेटी रुपयांपेक्षा कमी मूल्य झाले. २३ फेब्रुवारी २०२३ राेजी ५६,००० काेटींचा फटका गेल्या ५० दिवसांमध्ये बसला आहे.

टॅग्स :एलआयसीअदानी