Join us  

LIC: झोमॅटो IPO वर मोठी अपडेट; पहिल्यांदाच LIC पैसे गुंतवण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:28 AM

LIC may invest in Zomato IPO: एलआयसी देशातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदार कंपन्यांपैकी एक आहे. मात्र, एलआयसीने आजवर सेकंडरी मार्केट म्हणजेच शेअर बाजारात पैसे गुंतवत आली आहे.

फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) च्या आयपीओ १४ जुलै रोजी लाँच होणार आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऱ्यांसाठी मोठी संधी आहे. याचबरोबर आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे. सुत्रांनुसार देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) देखील यासाठी बोली लावण्याची तयारी करत आहे. एलआय़सी गैर सरकारी कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. (LIC may bid for shares in the Zomato IPO, as per the Livemint report.)

एलआयसी देशातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदार कंपन्यांपैकी एक आहे. मात्र, एलआयसीने आजवर सेकंडरी मार्केट म्हणजेच शेअर बाजारात पैसे गुंतवत आली आहे. झोमॅटोचा 9,375 कोटी रुपयांचा आयपीओ येणार आहे. मिंटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एलआयसी झोमॅटोच्या आयपीओमध्ये भाग घेणार आहे. झोमॅटोचा ग्राफ हा वाढता आहे. यासाठी एलआयसीच्या गुंतवणूक समितीची एक बैठक होणार आहे यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. एलआयसी प्रवक्त्याकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही. 

३१ मार्चला संपलेल्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार एलआसीची सार्वजनिक कंपन्यांमधील गुंतवणूक सर्वकालीन निचांकावर पोहोचली आहे. एलआयसीची २९६ कंपन्यांमध्ये १ टक्के हिस्सा आहे. हा या कंपन्यांच्या एकूण मार्केटच्या ३.६६ टक्क्य़ांएवढा आहे.  ३१ डिसेंबरला ही गुंतवणूक ३.७ टक्के होती. एलआयसी सरकारी कंपन्यांच्या पब्लिक इश्यूमध्ये भाग घेते. हा एक सरकारी योजनेचा भाग असतो. 

झोमॅटोचे व्हॅल्युएशन जानेवारीमध्ये 5.4 अब्ज डॉलर होते. ते जूनमध्ये 8 अब्ज डॉलर झाले आहे. कोरोना काळात लोक बाहेर पडण्यास घाबरत होते. यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढली आहे. आयपीओसाठी ब्रँड प्राईस 72 ते 76 रुपये ठेवण्यात आली आहे. झोमॅटो सध्या नुकसानीत आहे, 2023 मध्ये कंपनी पहिल्यांदाच फायद्यात येण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :एलआयसीझोमॅटोइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार