Join us
Daily Top 2Weekly Top 5

LIC मधून निवृत्त, मग 'सोनालिका'चे सम्राट! भारतातील सर्वात वयस्कर अब्जाधीशाचा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:03 IST

Success Story : नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर, वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभारले आहे.

Laxman Das Mittal : "यशाला वयाचं बंधन नसतं," हे वाक्य प्रत्यक्षात उतरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण दास मित्तल. बहुतेकांसाठी वयाची साठी ओलांडणे म्हणजे विश्रांतीचा काळ असतो, पण मित्तल यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी उद्योजकतेच्या मैदानात पाऊल ठेवले. आज त्यांचा 'सोनालिका ग्रुप' हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ट्रॅक्टर निर्माता असून, २१ हजार कोटींच्या या साम्राज्याने जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा फडकावला आहे.

LIC एजंट ते ट्रॅक्टर सम्राटपंजाबमधील होशियारपूर येथे १९३१ मध्ये जन्मलेल्या लक्ष्मण दास मित्तल यांचा प्रवास अत्यंत खडतर होता. १९५५ मध्ये त्यांनी भारतीय जीवन विमा निगममध्ये एजंट म्हणून काम सुरू केले. तेव्हापासूनच त्यांनी आपल्या पगारातील छोटा हिस्सा वाचवण्यास सुरुवात केली होती. १९९० मध्ये एलआयसीमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी सहा वर्षे घराचे आणि शेतीचे निरीक्षण केले. वयाच्या ६६ व्या वर्षी, म्हणजेच १९९६ मध्ये त्यांनी 'इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स' (सोनालिका) या कंपनीची पायाभरणी केली. आज जपानमधील दिग्गज 'यानमार' कंपनीची सोनालिकामध्ये ३० टक्के भागीदारी आहे, जे मित्तल यांच्या व्यवसायातील विश्वासार्हतेचे सर्वात मोठे प्रतीक आहे.

'सोनालिका' नावामागची रंजक कथा'सोनालिका' या नावाचा अर्थ 'सोन्याची रेघ' असा होतो. हे नाव भारताच्या हरित क्रांतीमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या गव्हाच्या एका प्रसिद्ध वाणावरून (व्हरायटी) प्रेरणा घेऊन ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणे आणि कृषी क्षेत्रातून देशाची प्रगती करणे, हाच मित्तल यांचा मुख्य उद्देश होता.

१४० देशांत पसरलेलं जाळेआज लक्ष्मण दास मित्तल हे भारतातील सर्वात वयस्कर अब्जाधीश उद्योजक म्हणून ओळखले जातात. सोनालिकाचे ट्रॅक्टर्स आज जगातील १४० देशांमध्ये विकले जातात. कंपनीचे २ लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय ग्राहक आहेत. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव असून, त्यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे २.५ अब्ज डॉलर (सुमारे २१,००० कोटी रुपये) आहे.

वाचा - ऑनलाईन पेमेंट आता 'डबल' सुरक्षित! १ एप्रिलपासून केवळ OTP पुरेसा नाही; पाहा काय आहे आरबीआयचा प्लॅन?

पुरस्कार आणि सन्मानलक्ष्मण दास मित्तल यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात प्रतिष्ठित 'उद्योग रत्न' पुरस्काराचाही समावेश आहे. वयाच्या ९० व्या वर्षीही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : From LIC Agent to Tractor King: Mittal's Inspiring Billionaire Journey

Web Summary : Laxman Das Mittal, a former LIC agent, founded Sonalika Group at 66. Now, he's India's oldest billionaire with a ₹21,000 crore tractor empire spanning 140 countries, proving age is no barrier to success.
टॅग्स :व्यवसायशेती क्षेत्रशेतकरीएलआयसी