नवी दिल्लीः एकीकडे दुष्काळ असला तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्यातच आता दिल्लीतल्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 160 रुपयांनी पडला असून, 33,170 रुपये प्रति 10 ग्रामसाठी आता मोजावे लागत आहेत. अखिल भारतीय सराफा संघ यांच्यामते, औद्योगिक युनिट आणि नाणे उत्पादनात झालेली घट यामुळे चांदीच्या भावात 625 रुपयांचं नुकसान झालं असून, चांदीचं नाणं प्रतिकिलोग्राम 37,625 रुपयांवर आलं आहे. रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्यानं सोन्याचे भाव गडगडले आहेत.जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव पडून 1286.50 डॉलर प्रति पौंडवर राहिला आहे. तर चांदीच्या किमतीत झालेल्या घट यामुळे भाव 14.58 डॉलर प्रतिपौंडवर आला आहे. नवी दिल्लीतल्या सराफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 160-160 रुपयांनी खाली येऊन क्रमशः 33,170 रुपये आणि 33,000 रुपये प्रति 10 ग्राम झालं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
खूशखबर! सोनं अन् चांदी खरेदी करणं झालं स्वस्त, जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 20:11 IST