देशातील सर्वात मोठी कंपनी मारूती सुझुकी ही आपल्या परवडणाऱ्या दरातील कार्ससाठी देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु पुढील महिन्यापासून कंपनी आपल्या काही ठराविक कार्सच्या किंमतीत वाढ करणार असल्याची माहिती कंपनीकडून सोमवारी देण्यात आली. अन्य उत्पादनांच्या वाढलेल्या किंमतींमुळे कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार या नव्या किंमती १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहेत. जर तुम्ही मारूती सुझुकीची कार विकत घेण्याच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी कमी दरात कार खरेदी करण्याची अखेरची संधी आहे. एप्रिल महिन्यात Maruti Alto पासून Maruti Brezza पर्यंत अनेक कार्स महाग होणार आहेत. या वर्षात कंपनी दुसऱ्यांदा आपल्या कार्सच्या किंमतीत वाढ करणार आहे. यापूर्वी कंपनीनं जानेवारी महिन्यात आपल्या कार्सच्या किंमती वाढवल्या होत्या. किती वाढेल किंमत?Maruti Suzuki नं दिलेल्या माहितीनुसार ही दरवाढ निरनिराळ्या कार्सच्या मॉडेलवर अवलंबून असणार आहे. परंतु कोणत्या कारची किंमत किती वाढेल याबाबत माहिती देण्यात आली नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाहन क्षेत्राला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तसंच मागणी कमी आणि कारसाठी आवश्यक असलेल्या अन्य उत्पादनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे काही कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली होती.मारूती सुझुकीच्या व्यतिरिक्त अन्य वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. यापूर्वी मारूती सुझुकीनं आपल्या गाड्यांच्या किंमतीत ३४ हजार रूपयांची वाढ केली होती. तर महिंद्रा मोटर्सनं १.९ टक्क्यांची तर टाटा मोटर्सनंही २६ हजार रूपयांची वाढ केली होती. तर दुसरीकडे इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये वाहनांच्या किंमती वाढल्या आणि इंधनाच्याही किंमती वाढल्या तरी प्रवासी वाहन आणि दुचाकींच्या मागणीत कोणतीही घट झाली नसल्याचं सांगण्यात आलं. कोरोनाच्या महासाथीदरम्यान लोकांनी सार्वजनिक वाहनांच्या ऐवजी खासगी गाड्यातून प्रवास करणं यावेळी पसंत केल्याचा दावा करण्यात आला.
Maruti Suzuki च्या गाड्या महागणार; एप्रिलपासून कंपनी दरवाढ करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 21:14 IST
Maruti Suzuki Price Hike: मारूती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे.
Maruti Suzuki च्या गाड्या महागणार; एप्रिलपासून कंपनी दरवाढ करण्याच्या तयारीत
ठळक मुद्देमारूती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे.यापूर्वीही कंपनीनं केली होती दरवाढ