Join us
Daily Top 2Weekly Top 5

माल्यासोबतचा वादग्रस्त व्हिडीओ ललित मोदींच्या अंगलट; ट्विट करत मागितली भारताची माफी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:25 IST

Lalit Modi-Vijay Malya : ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा एक व्हायरल व्हिडिओ अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला होता.

Lalit Modi-Vijay Malya : आयपीएलचे संस्थापक आणि भारतातून फरार घोषित करण्यात आलेले ललित मोदी सध्या आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहेत. नुकताच विजय माल्या यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मोदींनी स्वतःला आणि माल्याला 'भारताचे दोन सर्वात मोठे फरारी' म्हटले होते. यावर भारत सरकारने कठोर भूमिका घेताच, ललित मोदींनी आता नरमाईची भूमिका घेत 'एक्स'वर (ट्विटर) जाहीर माफी मागितली आहे.

"भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व!"ललित मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "जर माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, विशेषतः भारत सरकारबद्दल ज्यांचा मी मनापासून आदर करतो, तर मी त्यांची माफी मागतो." आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला असून कोणालाही अपमानित करण्याचा आपला हेतू नव्हता, असा दावाही त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे.

त्या 'व्हायरल' व्हिडिओत नक्की काय होते?काही दिवसांपूर्वी विजय माल्या यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त लंडनमध्ये एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना ललित मोदींनी कॅप्शन दिले होते, "चला, पुन्हा एकदा भारतातील इंटरनेट ब्रेक करूया." व्हिडिओमध्ये ललित मोदी हसताना आणि विजय माल्या यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणताना दिसत होते की, "आम्ही दोघे फरारी आहोत, भारताचे दोन सर्वात मोठे फरारी!" या व्हिडिओवर परराष्ट्र मंत्रालयाने कडक शब्दांत सुनावले होते. प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, "जे कायद्यापासून पळाले आहेत, त्यांना भारतात परत आणण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे."

माल्या आणि बँकांची १.८१ लाख कोटींची लढाईदुसरीकडे, ७० वर्षांचे विजय माल्या सध्या युकेमध्ये जामिनावर आहेत. किंगफिशर एअरलाईन्सच्या बुडीत कर्जाप्रकरणी त्यांच्यावर भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. २०२५ च्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने लंडनमध्ये एक महत्त्वाची कायदेशीर लढाई जिंकली आहे. किंगफिशरवरील सुमारे १.०५ बिलियन पाउंड (१.८१ लाख कोटी रुपये) वसुलीसाठी माल्यांविरुद्ध 'बँकरप्सी ऑर्डर' कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

वाचा - नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?

ललित मोदींवरील आरोप२०१० पासून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या ललित मोदींवर मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत. अंमलबजावणी संचालनालय त्यांच्या प्रत्यर्पणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांनी मागितलेली ही माफी कायदेशीर कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lalit Modi Apologizes After Malya Video Backlash; Seeks India's Forgiveness

Web Summary : Lalit Modi apologized after a video showing him with Vijay Malya, calling themselves 'India's biggest fugitives', went viral. Facing government criticism, Modi expressed regret, claiming his words were misinterpreted and offered an apology to the Indian government. He faces money laundering allegations.
टॅग्स :ललित मोदीविजय मल्ल्यायुनायटेड किंग्डमधोकेबाजी