Join us  

केंद्र सरकारपुढे झुकली 'ही' कोरियन कंपनी, आता भारतातच लॅपटॉप बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 10:41 PM

अमेरिकन कंपनी ॲपलने भारतात आपल्या उत्पादनांचे उत्पादन सुरू केल्यानंतर आता कोरियन कंपनीही भारतात आपल्या लॅपटॉपचे उत्पादन सुरू करणार आहे.

काही महिन्यापूर्वी ॲपलने आपले उत्तादन भारतात तयार करण्यास सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्यांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. आता आयफोन व्यतिरिक्त, कंपनी भारतात आपल्या इतर उत्पादनांचे उत्पादन देखील सुरू करणार आहे. याचा परिणाम इतर कंपन्यांवरही होत असून आता एक कोरियन कंपनीही भारतात आपल्या लॅपटॉपचे उत्पादन सुरू करणार आहे.

ॲपलची प्रतिस्पर्धी कोरियन कंपनी सॅमसंग आता आपले लॅपटॉप भारतात बनवणार आहे. कंपनी २०२४ पासून आपल्या नोएडा प्लांटमध्ये लॅपटॉपचे उत्पादन सुरू करणार आहे. सॅमसंगचे मोबाईल एक्सपिरियन्स बिझनेस हेड टीएम रोह यांनीही याला दुजोरा दिला आहे.

Paytm Payments बँकेचा परवाना रद्द होऊ शकतो? RBI'ने कारवाई का केली, 'हे' आहे कारण

टीएम रोह म्हणाले की, सॅमसंगसाठी भारत हे दुसरे मोठे उत्पादन केंद्र आहे. त्यामुळे कंपनी आता भारतात लॅपटॉपचे उत्पादन सुरू करणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू आहे. नोएडा हा सॅमसंगचा दुसरा सर्वात मोठा उत्पादन केंद्र आहे. प्लांटमध्ये काही किरकोळ बदल केले जात आहेत, जेणेकरून जागतिक मागणी पूर्ण करता येईल.

सॅमसंग या प्रकरणी भारत सरकारसोबत जवळून काम करत आहे. भारतासोबतचे आमचे सहकार्याचे संबंध आमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि आम्ही भविष्यातही एकत्र काम करत राहू.

सॅमसंगने भारतात लॅपटॉप बनवण्याचा घेतलेला निर्णय काही अचानक नाही. सॅमसंगला भारत सरकारच्या स्थानिक उत्पादनाच्या अटी मान्य करण्यास भाग पाडले आहे. गेल्या वर्षी सरकारने देशात परदेशी लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घातली होती. तो नंतर मागे घेण्यात आला असला तरी त्यामुळे बाजारातील अस्थिरता वाढली.

काही दिवसापूर्वीच सरकारने लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांवरील आयात शुल्क कमी केले आहे. तो १५ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आला आहे. तर अर्थसंकल्पातही सरकारने पीएलआय योजनेसाठी तरतूद वाढवली आहे. स्थानिक उत्पादन वाढवून सॅमसंगलाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :अॅपलनिर्मला सीतारामन