Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेस्लेची १२ टन चॉकलेटची खेप चोरीला! बॅच कोडद्वारे ग्राहकांना ओळखता येणार चोरीचा माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 10:58 IST

KitKat Heist : स्विस कंपनी 'नेस्ले'च्या मालकीची, १२ टनांची 'किट-कॅट' चॉकलेट्सची एक खेप इटलीहून पोलंडकडे जात असताना चोरीला गेली.

KitKat Heist : जगप्रसिद्ध चॉकलेट ब्रँड 'किटकॅट' तयार करणारी कंपनी 'नेस्ले' सध्या एका विचित्र चोरीमुळे चर्चेत आली आहे. इटलीतील प्रोडक्शन प्लांटमधून पोलंडच्या दिशेने निघालेली तब्बल १२ टन (सुमारे ४,१३,७९३ बार) किटकॅट चॉकलेटची मोठी खेप वाटेतच रहस्यमयरीत्या गायब झाली आहे. विशेष म्हणजे, ज्या ट्रकमधून हे चॉकलेट नेले जात होते, त्या वाहनाचाही अद्याप पत्ता लागलेला नाही.

वितरणादरम्यान चोरी'एसोसिएटेड प्रेस'ने दिलेल्या माहितीनुसार, वेफर आणि चॉकलेटने बनवलेले हे किटकॅट बार गेल्या आठवड्यात उत्पादन केंद्र आणि वितरण साखळीच्या दरम्यान कोठेतरी बेपत्ता झाले. ही खेप संपूर्ण युरोपमध्ये पाठवली जाणार होती. कंपनीने शुक्रवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून "वाहन आणि त्यातील माल अद्याप सापडलेला नाही," अशी कबुली दिली आहे.

बॅच कोड ठरणार चोरट्यांचा काळ!चोरीला गेलेले हे चॉकलेट युरोपमधील अनौपचारिक किंवा काळ्या बाजारात विकले जाण्याची शक्यता नेस्लेने व्यक्त केली आहे. मात्र, कंपनीने ग्राहकांना आणि दुकानदारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक चॉकलेट बारवर एक विशिष्ट 'बॅच कोड' असतो. ग्राहक किंवा घाऊक विक्रेते हा कोड स्कॅन करून ते चोरीच्या खेपेतील आहे की नाही, हे ओळखू शकतात. जर कोणाला चोरीचा माल आढळला, तर त्यांनी त्वरित कंपनीला सूचित करावे, त्यानंतर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नेस्लेने स्पष्ट केले आहे.

'हॅव अ ब्रेक'चा चोरट्यांनी घेतला फायदा!या घटनेवर भाष्य करताना किटकॅटच्या प्रवक्त्याने मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, "आम्ही नेहमीच लोकांना सांगतो की 'Have a break, have a KitKat', पण असे वाटते की चोरट्यांनी आमचा हा सल्ला काही जास्तच गांभीर्याने घेतला आणि थेट १२ टन चॉकलेट घेऊनच मोठा 'ब्रेक' घेतला आहे."

वाचा - १ एप्रिलपासून बदलणार ATM चे नियम! पाहा काय असेल Free आणि कशाचे लागतील पैसे, 'या' ३ बँकांनी जारी केले निर्देश

उद्योगासमोर वाढते आव्हानमजेचा भाग सोडल्यास, मालाची चोरी ही सध्या जागतिक व्यवसायांसमोर एक गंभीर समस्या बनली आहे. नेस्लेच्या मते, चोरीच्या पद्धती आता अत्यंत आधुनिक आणि चतुर झाल्या आहेत. अशा घटनांमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर ब्रँडच्या विश्वासार्हतेवरही परिणाम होतो. म्हणूनच जनजागृती करण्यासाठी कंपनीने ही घटना सार्वजनिक केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nestle's 12-ton chocolate shipment stolen; batch codes to identify.

Web Summary : A 12-ton shipment of Nestle's KitKat chocolates vanished in Italy en route to Poland. Nestle suspects black market sale and advises customers to check batch codes to identify stolen goods. The company urges reporting suspicious finds.
टॅग्स :गुन्हेगारीव्यवसायआंतरराष्ट्रीय